कोयना धरणाचा पाणीसाठा 47 टीएमसीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 13:18 IST2022-07-15T13:16:35+5:302022-07-15T13:18:55+5:30
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे.

कोयना धरणाचा पाणीसाठा 47 टीएमसीवर
प्रमोद सुकरे
कराड : कोयनानगर (ता. पाटण) येथील कोयना धरणात आज, शुक्रवारी सकाळपर्यंत पाणीसाठा 47.05 टीएमसी इतका झाला आहे. मागील 24 तासात 3.87 टीएमसी पाण्याची धरणात वाढ झाली आहे.
गत आठवडाभरापासून राज्यात सर्वत्र पावसाचा जोर वाढला आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असून धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. सध्या धरणात पाण्याची आवक 46.450 क्यूसेक्स प्रमाणे होत आहे. परिणामी पायथावीज ग्रहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गेल्या 24 तासात कोयनानगर 107 मिलीमीटर, नवजा 59 मिलिमीटर, महाबळेश्वर 143 मिलीमीटर अशी पावसाची नोंद आहे.