शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
2
NEET परीक्षेत मोठा बदल, पुढच्या वर्षापासून...; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र यांची मोठी घोषणा!
3
Top Marathi News LIVE Updates: हडपसरमध्ये बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीला नागपुरातून अटक
4
चमत्कारिक प्रसूती! महिलेनं ५ दिवसांच्या अंतरानं दिला ४ बाळांना जन्म, आईसह मुलेही सुखरूप
5
प्रेमासाठी लेकीनेच केला घात; प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी कोट्यधीश बापाच्या घरातच मुलीने टाकला दरोडा
6
महाराष्ट्रात सुरू होणार एसआयआर, मतदारांना काय करावं लागेल? जाणून घ्या!
7
हडपसर बॉम्ब प्रकरणात मोठी कारवाई; नागपूर रेल्वे स्टेशनवरून संशयित ताब्यात; आणखी किती जण रडारवर?
8
पहिले 'महामंदी' आता आणखी एक मोठा इशारा! रॉबर्ट कियोसाकी म्हणाले, "महागाई आणि कर्ज तुमची संपत्ती..."
9
युवराज सिंगच्या वडीलांविरोधात गुन्हा दाखल; महिलांबद्दल आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप!
10
Unnao Rape Case : कुलदीप सेंगरला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का! उच्च न्यायालयाचा 'तो' निर्णय रद्द; अडचणीत वाढ
11
मोहन जोशींनी स्वामींची भूमिका करण्यास दिलेला नकार; प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले- "त्यांना चालता-बोलता येत नव्हतं..."
12
स्वप्नपूर्ती! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने मुंबईत घेतलं हक्काचं घर, शेअर केले सुंदर फोटो; म्हणाली...
13
वास्तू टिप्स: पिठाचा डबा कधीही पूर्ण रिकामा का करू नये? स्वयंपाकघरातील 'या' चुका आजच सुधारा
14
NEET Scam 2026: ७२० पैकी फक्त १०७ गुण! वडिलांनी १० लाखांत पेपर खरेदी करूनही मुलगा नापास
15
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
16
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
17
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
18
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
19
Monsoon 2026 Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
Daily Top 2Weekly Top 5

महू-हातगेघरचे पाणी ‘कुडाळी’त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 00:53 IST

प्रस्तावाला मंजुरी : कुडाळ गावच्या मागणीनंतर पाणी आल्याने आनंदाचे वातावरण

सातारा : कुडाळ, शेते, कळंबे, सर्जापूर, उडतारे या गावांची वरदायिनी असणारी कुडाळी नदी सद्य:स्थितीत पूर्णपणे आटलेली आहे. नदी आटल्याने या गावांच्या पाणी योजना अडचणीत आल्या असून, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवू लागले आहे. कुडाळमध्ये बुधवार-गुरुवारी यात्रा असून, महू-हातगेघरचे पाणी नदीत सोडल्याने पाण्याचा प्रश्न मिटला आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जावळीचे तहसीलदार रणजित देसाई यांनी महू-हातगेघर धरणातील पाणी सोडण्याचे आदेश व्हावेत, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता, हा प्रस्ताव जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी पाटबंधारे खात्याकडे पाठविला असून, त्यांच्याकडचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. यात्रेला अवघा एक दिवस राहिला असल्याने कुडाळ ग्रामस्थांमध्ये चिंतेचे तसेच संतापाचे वातावरण आहे.
जावळी तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असणाऱ्या कुडाळात ग्रामदैवत वाकडेश्वराची यात्रा मोठ्या प्रमाणात भरते.
कुडाळी नदी कोरडीठाक पडल्याने या नदीलगत असणाऱ्या पाणी योजना बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. शेतीसाठीही पाणी उपलब्ध होत नाही. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तत्काळ निर्णय घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केलेली आहे.
महू-हातगेघर धरणातील पाणी कुडाळी नदीत सोडल्यास कुडाळ, कळंबे, सर्जापूर, उडतारे येथील पाणी योजनांना दिलासा मिळणार आहे.
तहसीलदार रणजित देसाई यांनी दिलेल्या प्रस्तावामुळे या चारही गावांमध्ये उत्साह आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी यावर निर्णय घेण्याची शक्यता असून, यात्रेपूर्वी कुडाळी नदीत पाणी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हे पाणी उपलब्ध झाल्यामुळे पाच ते सहा गावांतील लोक आनंदित आहेत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. (प्रतिनिधी)