शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

विचारांची ज्योत तेवत राहायला हवी- हौतात्म्याला एक वर्ष...

By admin | Updated: August 18, 2014 23:39 IST

धार्मिक क्षेत्रातील प्रतिक्रिया

राजीव मुळ्ये - सातारा --उपासनेला, धर्माला, श्रद्धेला कधीही विरोध न करता, त्या श्रद्धेचा गैरफायदा घेणाऱ्यांचा विचारांच्या माध्यमातून समाचार घेणारे, विवेकाने वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांना विचारांनी उत्तर देणे नाकारून त्यांची हत्या होणं धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींनाही खटकलंय. डॉक्टरांनी देवा-धर्माला कधीच विरोध केला नाही. मात्र समाजवादी विचार, आर्थिक आणि सामाजिक समता हे उद्दिष्ट मानून सुधारकांचे विचार कृतीत आणले, हे सर्वांनी पाहिलंय. त्यामुळं त्यांच्या विचारांची ज्योत तेवत राहावी, असं धार्मिक क्षेत्रातही मानलं जातं.चुकीच्या कल्पना, चुकीच्या रूढी आणि चुकीच्या विचारांना डॉक्टरांनी आजन्म विरोध केला. आपल्या सुखदु:खाचा विचार न करता आयुष्यभर विचारक्रांतीला वाहून घेतलं. लोकांना चुकीच्या वाटेने जाताना पाहून त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला या कामात आयुष्यही गमवावं लागलं, याची खंत इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीही बोलून दाखवितात.धार्मिक क्षेत्रातील प्रतिक्रियाश्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक डॉक्टरांच्या बलिदानानंतर तरी अनेक लोकांना दिसू लागला आहे. जादूटोणा करणाऱ्यांमुळे खऱ्या श्रद्धाळूंच्या मनात संभ्रम निर्माण होतो. अंधश्रद्धा कमी झाल्याच पाहिजेत, असे माझे मत आहे. डॉक्टरांच्या बलिदानामुळे लोक या विषयाकडे डोळसपणे पाहू लागतील आणि हळूहळू खऱ्या श्रद्धाच शिल्लक राहतील.- ओंकार बोडस, पुरोहितज्यांनी संपूर्ण आयुष्य चुकीच्या कल्पना, रूढींना विरोध करण्यासाठी वेचले, त्यांना याकामी आयुष्य गमवावं लागलं, याची खंत उभ्या महाराष्ट्राला आहे. त्यांचा पूजेला नव्हे, अघोरी प्रकारांना विरोध होता. विचाराला हिंसेने उत्तर देऊन चालत नाही. येणाऱ्या दिवसांत त्यांचे बुद्धिवादी विचार, जे सावरकर-आगरकरांनीही मांडले, त्याची अंमलबजावणी पुरोगामी महाराष्ट्रात व्हायला हवी.- रमणलाल शहा, ज्योतिषतज्ज्ञमाणूस गरज म्हणून अंधश्रद्धेकडे वळतो. त्याचं मानसशास्त्र समजून घेतलं पाहिजे. गरजवंताचा गैरफायदा घेऊन काही जण शास्त्रोक्त काम न करता पैसे उकळण्याचं काम करतात. त्यातून एखाद्याला लाभ झाला तर तो संबंधिताचा उदोउदो करतो आणि गैरप्रकार वाढत जातात. वैचारिक मतभेद असतील, तर ते चर्चेने सुटू शकतात; मात्र त्यासाठी हिंसेचा मार्ग कोणत्याही परिस्थितीत निषेधार्हच!- प्रसाद चाफेकर, वास्तुशास्त्रतज्ज्ञमाणसाच्या वर्तनावर अंकुश ठेवण्यासाठी धर्माची निर्मिती झाली. माणसावर कायद्यापेक्षाही अधिक धाक धर्माचा असू शकतो; मात्र काही लोकांनी धर्मात नंतर अनावश्यक बाबी आणल्या. अशा बाबी डॉ. दाभोलकरांनी उघड केल्या. त्यांची हत्या होण्याने महाराष्ट्राचे नुकसान झाले असून, मारेकरी न सापडणे हे प्रशासनाचे अपयश होय.- तुषार पाटील, विश्वस्त, भैरवनाथ मंदिर ट्रस्ट, करंजे