शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

गावकारभाऱ्यांची निवड २६ ते २८ दरम्यान!

By admin | Updated: August 19, 2015 21:19 IST

कऱ्हाड तालुका : आठवड्याचा अवधी; गावोगावी सरपंचाच्या निवडीची तयारी

कऱ्हाड : कऱ्हाड तालुक्यातील ९८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या निवडीचा कार्यक्रम नुकताच निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केला आहे. या जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार दि. २६ ते २८ आॅगस्ट दरम्यान ९७ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाची निवड होणार असल्याची माहिती तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी दिली आहे.पाच ग्रामपंचायत बिनविरोध झाल्यानंतर उरलेल्या ९८ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडल्यानंतर आता सरपंचपदाच्या निवडीकडे ग्रामीण भागातील लोकांचे लक्ष लागून राहिले होते. ग्रामीण भागात ज्या गावात सर्वसाधारण गटातील सरपंचपदासाठी निवड करावयाची आहे. त्यासाठी काही दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.गावाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून महत्तवाच्या मानल्या जाणाऱ्या सरपंचपदाच्या निवडीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. तालुक्यातील ग्रामपंचायतीवर कोणत्या राजकीय पक्षाचे वर्चस्व राहणार आहे याचा फैसला सरपंचपदाच्या निवडीनंतरच होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्षातील मंडळींनी देखील या सरपंचपदाच्या निवडीकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तर तालुक्यातील हजारमाची येथील ग्रामपंचायतीची सरपंचपदाची मुदत सप्टेंबर महिन्यात पूर्ण होणार आहे. मुदत संपेपर्यंत ग्रामपंचायतीत निवडून आलेले सदस्य नामधारी असणार आहेत. (प्रतिनिधी)२८ रोजी निवडी होणाऱ्या ग्रामपंचायतीपार्ले, आबईचीवाडी, बामणवाडी, भरेवाडी, भवानवाडी, भुयाचीवाडी, चचेगाव, चिखली, चोरे, धोंडेवाडी, गोळेश्वर, कालवडे, कामथी, करवडी, केसे, खोडशी, खोडजाईवाडी, खुबी, किरपे, कोडोली, म्हारूगडेवाडी, म्हासोली, नांदगाव, नवीन कवठे, सैदापूर, साजूर, साळशिरंबे, शहापूर, शेवाळेवाडी (उंडाळे), वडोली निळेश्वर, वराडे, वसंतगड, येणके या ३३ गावांतील निवडणूका होणार आहेत.२६ रोजी निवड होणाऱ्या ग्रामपंचायती...अंबवडे, भोळेवाडी, गमेवाडी, घोगाव, गोटेवाडी, हणबरवाडी, हरपळवाडी, इंदोली, जिंती, कार्वे, काले, खालकरवाडी, कोणेगाव, मालखेड, म्होप्रे, मौजे साकुर्डी, मुंढे, निगडी, रिसवड, शेळकेवाडी, उंडाळे, विरवडे, वडगाव (उंब्रज), वहागाव, वाठार आणि विंग या २६ गावांत सरपंचपदाची निवड होणार आहे.२७ रोजी निवडी होणाऱ्या ग्रामपंचायती...आकाईचीवाडी, बनवडी, बेलवडे बुद्रुक, बेलदरे, बेलवडे हवेली, भुरभुशी, चौगुलेमळा, गायकवाडवाडी, घारेवाडी, घोणशी, गोवारे, खराडे, कोळे, लटकेवाडी, मरळी, नांदलापूर, ओंड, पाचुंद, पाडळी-केसे, पाल, पेरले, पोतले, सवादे, शेवाळेवाडी (म्हासोली), शिरवडे, शिवडे, टाळगाव, वस्ती साकुर्डी, वाघेरी, वाघेश्वर, वारूंजी, येरवळे, गोटे या ३३ गावांतील सरपंचपदाची निवड होणार आहे.