विलासकाका पाटील - गरिबांचा आधारवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST2021-01-08T06:05:57+5:302021-01-08T06:05:57+5:30

किडगाव : ‘विलासकाका पाटील यांचे व्यक्तिमत्त्व साधे, सरळ होते. गरिबांना आधार व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम त्यांनी केले,’ असे ...

Vilaskaka Patil - Support for the poor | विलासकाका पाटील - गरिबांचा आधारवड

विलासकाका पाटील - गरिबांचा आधारवड

किडगाव : ‘विलासकाका पाटील यांचे व्यक्तिमत्त्व साधे, सरळ होते. गरिबांना आधार व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम त्यांनी केले,’ असे प्रतिपादन लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस यांनी केले.

लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेच्या गेंडामाळ, नागेवाडी कुशी, एमआयडीसी (कोडोली) येथील विद्यालयात विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या संचालिका शिल्पा चिटणीस, मुख्याध्यापिका नंदा निकम, विद्या बाबर, हेमंत भुजबळ, नितीनकुमार कसबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

चिटणीस पुढे म्हणाले, ‘काकांच्या शब्दाला समाजामध्ये मोठी किंमत होती. धडपडीतून मोठे झालेले त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. सातारा येथे आयोजित नाट्यसंमेलनावेळी त्यांची आणि माझी जवळीक निर्माण झाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे लोकमंगल ग्रुप संस्थेच्या विविध शाळा सुरू झाल्या. संस्थेचा पाया रचण्यात काकांचा मोठा वाटा होता. जीवनात चांगली माणसे जोडल्यामुळे त्यांच्या हातून मोठे काम उभे राहिले. चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्त्व म्हणून काकांना महाराष्ट्रभर ओळखले जाते.’

नितीन कुमार कसबे म्हणाले, ‘धडाडीचे आमदार म्हणून काकांची महाराष्ट्रभर वेगळी ओळख होती. स्वतःच्या प्रपंचाचा विचार काकांनी कधीही केला नाही. आयुष्यात त्यांनी पराभव कधीही स्वीकारला नाही. सप्तपदी आमदार म्हणून काकांची एक वेगळी ओळख होती.’

या कार्यक्रमास विजय यादव, गुलाब पठाण, काकासाहेब निकम, प्रदीप लोहार, संगीता कुंभार, प्रतिभा वाघमोडे, बाळकृष्ण इंगळे, अभिजित वाईकर, यशवंत शीलवंत, सतीश पवार, विजय गव्हाळे, चंद्रकांत देवगड तसेच विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

Web Title: Vilaskaka Patil - Support for the poor