शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

वाहनांनी चिरडले अडीच हजार जीव! बारा वर्षांचे निरीक्षण; प्राणी, पक्ष्यांचा दुर्दैवी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:27 IST

कऱ्हाड : प्राणी, पक्ष्यांना मानवनिर्मित कारणांमुळे आपला जीव गमवावा लागतोय. पिकांवरील औषध फवारणी, नष्ट होणारी वसतिस्थाने, शिकार आदी कारणास्तव प्राणी, पक्ष्यांवर मृत्यू ओढावतोय. त्याचबरोबर वाहनांच्या धडकेतही दरवर्षी

ठळक मुद्देफक्त पंचवीस किलोमीटरमध्ये शेकडो बळी

- लोकमत विशेषसंजय पाटील ।कऱ्हाड : प्राणी, पक्ष्यांना मानवनिर्मित कारणांमुळे आपला जीव गमवावा लागतोय. पिकांवरील औषध फवारणी, नष्ट होणारी वसतिस्थाने, शिकार आदी कारणास्तव प्राणी, पक्ष्यांवर मृत्यू ओढावतोय. त्याचबरोबर वाहनांच्या धडकेतही दरवर्षी शेकडो प्राणी-पक्षी मृत्युमुखी पडतायत. गत बारा वर्षांत २ हजार ५९९ प्राणी, पक्ष्यांचा वाहनांखाली बळी गेल्याचा निष्कर्ष एम. एन. रॉय अनौपचारिक शिक्षण व संशोधन संस्थेने सर्व्हेतून मांडलाय.

वेगवेगळ्या मार्गांवर वाहनांखाली चिरडून प्राणी, पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. त्यासाठी कºहाडातील एम. एन. रॉय अनौपचारिक शिक्षण व संशोधन संस्थेने याची दखल घेत नोंदी करण्यास सुरुवात केली. संस्थेच्या पर्यावरण विभागाचे संचालक सुधीर कुंभार यांनी २००२ पासून हे काम हाती घेतले. सर्व्हेसाठी त्यांनी कºहाड ते ढेबेवाडी या २५ किलोमीटर रस्त्याची निवड केली. दररोज सकाळी व सायंकाळी या मार्गावरून त्यांचा प्रवास सुरू झाला. प्रवासातच वाहनाच्या धडकेत मृत्युमुखी पडलेल्या पक्षी, प्राण्याची नोंद करणे, छायाचित्र घेणे व या नोंदी एका वहीत संकलित करून वर्षाअखेरीस त्याचे वर्गीकरण करण्याचे काम डॉ. सुधीर कुंभार यांनी केले.

डॉ. कुंभार यांच्यासह अल्केश ओहळ, देवानंद पांढरपट्टे, बबन साबळे, सुनील जंगम, बी. ए. चोरघे हे सहाजण २५ किलोमीटरच्या अंतरात दररोज निरीक्षण करून त्याची एकत्रित नोंद ठेवतात.कऱ्हाड : प्राणी, पक्ष्यांना मानवनिर्मित कारणांमुळे आपला जीव गमवावा लागतोय. पिकांवरील औषध फवारणी, नष्ट होणारी वसतिस्थाने, शिकार आदी कारणास्तव प्राणी, पक्ष्यांवर मृत्यू ओढावतोय. त्याचबरोबर वाहनांच्या धडकेतही दरवर्षी-ढेबेवाडी मार्गावर जुलै २००५ ते जून ०६ अखेर १११ प्राणी व ३९ पक्षी, २००६-०७ अखेर १४५ प्राणी व ५३ पक्षी, २००७-०८ अखेर १७४ प्राणी व ६७ पक्षी, २००८-०९ अखेर १९६ प्राणी व ५५ पक्षी, २००९-१० अखेर १६० प्राणी व ५७ पक्षी, २०१०-११ अखेर १८९ प्राणी व ६२ पक्षी, २०११-१२ अखेर १४८ प्राणी व ५२ पक्षी, २०१२-१३ अखेर १७८ प्राणी व ६४ पक्षी,२०१३-१४ अखेर १४० प्राणी व ५१ पक्षी, २०१४-१५ अखेर १२९ प्राणी व ३३ पक्षी, २०१५-१६ अखेर ११३ प्राणी, २९ पक्षी, २०१६-१७ अखेर १०० प्राणी व ६३ पक्षी आणि २०१७ ते आजअखेर १३४ प्राणी व ५० पक्षी असे एकूण २ हजार ५९९ प्राणी व पक्ष्यांना वाहनाखाली चिरडून मृत्यू झाला.काही वाचवतात, काही मुद्दाम चिरडतातनिरीक्षणाचा एक भाग म्हणून डॉ. कुंभार यांनी काही वाहनचालकांशी चर्चा केली. त्यावेळी काहींनी ‘प्राणी, पक्षी रस्त्यावर दिसल्यास त्याला वाचविण्याचा प्रयत्न करतो,’ असे सांगितले. मात्र, ‘प्राणी, पक्ष्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात कसा घालणार? वाचविण्याचा प्रयत्न करतो. वाचले तर नशीब नाहीतर नाइलाज होतो,’ असे काही चालकांनी सांगितले. रस्त्यावरून सरपटत जाणाऱ्या लहान प्राण्याला किंवा पक्ष्याला मुद्दाम चिरडणारे काही बेदरकार वाहनचालकही असल्याचे कुंभार यांनी सांगितले.अन्नासाठी मृत्यूच्या दाढेतप्राणी व पक्ष्यांना अन्नाचे दुर्भिक्ष जाणवत आहे. त्यामुळे ते अन्नाच्या शोधात रस्त्याच्या कडेला येतात. रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात वाहन धडकल्याने त्यांचा मृत्यू होतो. तसेच रस्त्यावर मृतावस्थेत पडलेल्या प्राण्याचे मांस खाण्यासाठी येणाºया इतर प्राणी व पक्ष्यांचाही वाहनांच्या धडकेत मृत्यू झाल्याचे निरीक्षण संस्थेने नोंदविले आहे. रस्त्यावर पडलेले प्राणी व पक्षी हटविले जात नाहीत. त्यावरून वाहने जाऊन काही प्राण्यांचे देह छिन्नविच्छिन्न होतात. त्यामुळे ते ओळखताही येत नाहीत.कुत्रा, सापांची संख्या जास्तपक्ष्यांमध्ये शिंपी, कोंबड्या, बुलबूल, साळुंख्या, कावळे, नर्तक, कोकीळ, सुगरण, भारद्वाज, दयाळ, पाणकोंबडी, पिंगळा, सूर्यपक्षी, होला आदींचा वाहनांखाली सापडल्याने मृत्यू ओढवल्याचे दिसून आले आहे. सस्तन प्राण्यांमध्ये कुत्री, मांजर, ससा, माकड, मुंगूस, खारी. सरपटणाºया प्राण्यांमध्ये सरडे, सापसुरळ्या, शॅमेलिआॅन तसेच सँडबोआ, धामण, नाग, घोणस, हरीणटोळ, गवत्या, येरूळा, अजगर, धूळनागीण, नानाटी, तस्कर आदी साप वाहनाखाली सापडून मृत झाले आहेत. वाहनांखाली सापडणाºया प्राण्यांमध्ये कुत्री व सापांची संख्या तुलनेने जास्त असल्याचे निरीक्षणावरून स्पष्ट झाले आहे.एप्रिल २०१७ ते मार्च २०१८ अखेर १८४ बळीएम. एन. रॉय संस्थेच्या सदस्यांनी एप्रिल २०१७ ते ३० मार्च २०१८ अखेरची निरीक्षणे नोंदवली. या एका वर्षात कुत्रा, मांजर, खार, माकड, रानउंदीर अशा ७४ सस्तन प्राण्यांचा, साप, सरडा, शॅमिलिआॅन सरडा अशा सरपटणाºया ६० प्राण्यांचा आणि, कोंबडी, बुलबूल, सातभाई, कावळा, भारद्वाज, सुगरण, साळुंखी, सनबर्ड, कोकीळ अशा ५० पक्ष्यांचा तर १० इतर प्राणी, पक्ष्यांचा वाहनाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे.प्राणी असो अथवा पक्षी, तेही एक जीवच आहे आणि हे जीव वाचविण्याचे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. वाहनाखाली अपघाताने प्राणी-पक्षी मृत्युमुखी पडणे नवीन नाही. मात्र, जबाबदारीने वाहन चालविल्यास असे मृत्यू टाळता येतील. त्यासाठी आम्ही वाहनचालकांमध्ये जनजागृतीही करतो. तसेच जखमी प्राणी अथवा पक्षी सापडल्यास त्याला तातडीने वैद्यकीय उपचार देतो.- डॉ. सुधीर कुंभार,  संचालकएम. एन. रॉय संस्था,कऱ्हाड