शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

थंडीचा स्ट्रॉबेरीसह भाजीपाल्याला फटका, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 7:33 PM

आठवडाभर सर्वत्र थंडीचा जोर वाढला असून, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये ० ते उणे २ पर्यंत नीचांकी तापमान गेले. त्यामुळे परिसरातील स्ट्रॉबेरीसह फळ, भाजीपाल्याचे पिके कोमेजली आहेत. त्यामुळे अक्षरश: हजारो किलो स्ट्रॉबेरीची फळे फेकून देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देथंडीचा स्ट्रॉबेरीसह भाजीपाल्याला फटकाशेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान : नीचांकी तापमानाने थंडीचा जोर वाढला

महाबळेश्वर : आठवडाभर सर्वत्र थंडीचा जोर वाढला असून, महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये ० ते उणे २ पर्यंत नीचांकी तापमान गेले. त्यामुळे परिसरातील स्ट्रॉबेरीसह फळ, भाजीपाल्याचे पिके कोमेजली आहेत. त्यामुळे अक्षरश: हजारो किलो स्ट्रॉबेरीची फळे फेकून देण्यात आली आहेत. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.महाबळेश्वर परिसरात मागील तीन ते चार दिवसांपासून अचानक वाढलेल्या थंडीने विक्रमच केला. वेण्णा तलाव ते लिंगमाळा परिसरातील नीचांकी तापमान ० ते उणे २ पर्यंत गेले होते. रविवारी सकाळी मळेधारक स्ट्रॉबेरीची फळे तोडण्यासाठी आपल्या मळ्यात गेले तेव्हा तेथील फळांची गंभीर परिस्थिती पाहून अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाहीत.

थंडीचा कडका व हिमकणांमुळे स्ट्रॉबेरी, फळभाज्या, पालेभाज्या व फूल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची रोपे गारठून मरू लागली आहे. त्यामुळे बाजार आणलेल्या स्ट्रॉबेरी फळे ही नासलेली आढळून आली. तसेच त्यांचा आकार व बेचव लागत आहेत. अशीच परिस्थिती फळ, पाले भाज्या व शोभिवंत फूल शेतीची झाली आहे. त्याच्या मळ्यातील तूतू (मलबेरी), जांभूळ,पेरूची झाडे थंडीमुळे पूर्णपणे काळी पडली आहेत.

वांगी, वाटणा, फारशी, मिरची, कोबी, फ्लॉवर आदीची रोपेही जाळून गेली आहेत. झेंडू, गुलाब, जरबेरी, कर्दळ, सदाफुली, बिगोनिया आदी शोभिवंत फुलांची आजची अवस्था अत्यंत केविलवाणी झाली आहे.कडाक्याच्या थंडीने जळून व कुजून गेल्याने अक्षरश: हजारो किलो स्ट्रॉबेरीची फळे रस्त्याकडेला फेकून देण्याची वेळ मळेधारकांवर आली आहे. हीच परिस्थिती वाटाणा, कोबी, फ्लॉवर फळ, पालेभाज्या व फूल शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची असून, त्यांचेही लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे मळेधारक हवालदिल झाला असून, हातातोंडाला आलेल्या फळांचे अचानक नुकसान झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर जणू शोककळाच पसरली आहे.हंगाम गेला वाया..महाबळेश्वर म्हटंले की स्ट्रॉबेरीची मधुर फळे डोळ््यासमोर येतात. परिसरातून दररोज हजारो टन स्ट्रॉबेरी देशभरात पाठविली जातात. मात्र, थंडीच्या कडाक्याने रोपेच जळाल्याने यंदाचा हंगामच वाया गेला आहे. त्यामुळे आता पुन्हा नवीन रोपे लावणे व त्यांना फळे येण्यासाठी पुन्हा एक ते दीड महिने थांबावे लागणार आहे. शिवाय एप्रिल-मे महिन्यांत काही भागात पाण्याची कमतरता भासत असल्याने त्याचा काहीच उपयोग होणार नाही. 

एवढी मेहनत करून, रात्रंदिवस पहारा करून गव्यापासून त्याचे रक्षण केले. मात्र आजच्या अचानकच्या संकटामुळे तयार फळे फेकण्याची वेळ आली आहे. शासनाने खास बाब म्हणून तातडीची मदत करावी.- आसिफभाई मुलाणी,मळेधारक शेतकरी

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानSatara areaसातारा परिसर