शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धी पवार यांच्या बुद्धिमत्तेचा स्तर समजला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

सातारा : खुलेआमपणे स्वार्थासाठी खुर्चीला चिटकून राहणारी मी नाही असा खोटा आव आणणाऱ्यांचा बुधवार उजाडून गेला तरी कथित राजीनामा ...

सातारा : खुलेआमपणे स्वार्थासाठी खुर्चीला चिटकून राहणारी मी नाही असा खोटा आव आणणाऱ्यांचा बुधवार उजाडून गेला तरी कथित राजीनामा आलेला नाही. त्यांनी केलेले तथ्यहीन आरोप हे निराधार आहेतच; परंतु त्रागा करताना त्यांनी त्यांच्या मूळ संस्कृतीचे प्रदर्शन केले आहे. त्यांच्या बोलण्यामुळे सर्वसामान्य सातारकरांना तथाकथित बुद्धिमत्तेचा स्तर समजला,’ असा घणाघात नगराध्यक्षा माधवी कदम यांनी नगरसेविका सिद्धी पवार यांच्यावर केला आहे.

सिद्धी पवार यांनी सातारा विकास आघाडीवर बेलगाम आरोप करताना सार्वजनिक बांधकाम सभापतिपदाचा राजीनामा देत असल्याचे वक्तव्य शनिवारी केले होते. पवार यांचे सर्व आरोप नगराध्यक्षांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे खोडून काढले आहे.

त्या म्हणाल्या, ‘सातारा नगरपरिषदेत कोणीही जादू करीत नाही. तथापि विकासाची कामे जादू प्रमाणे लगेच झाली पाहीजे असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांना जादूगारच भेटला पाहिजे. तांत्रिक मंजुरी, प्रशासकीय मंजुरी, निधीची तरतूद, शासकीय योजनेत संबंधित काम मंजूर होणे, त्यापुढे निविदा, संविदा, कार्यादेश इत्यादी अनेक टप्पे पार पाडल्याशिवाय कोणी कितीही जादूटोण्याचा, काळ्या जादूचा आणि अघोरी उपायांचा प्रयत्न केला तरी ते शक्य होत नाही. त्यामुळे सिद्धी पवार यांनी ज्या अटल स्मृती उद्यानाचा व इतर विषय होत नाही म्हणून राजीनामा देण्याची धमकी दिली होती, त्या भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नखाइतका तरी सुसंस्कृतपणा आत्मसात करावा आणि मगच आपली जीभ टाळ्याला लावावी.

खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांनी लोकसभे अंतर्गत स्थापित असलेल्या कुठल्या कमिटीचा राजीनामा दिला नव्हता. खा. उदयनराजे भोसले यांचा आदर्श घेऊन, सिद्धी पवार यांनी मात्र सभापतिपदाचा म्हणजेच एका कमिटीचा राजीनामा देत आहे, असे त्या पत्रात नमूद केले आहे. त्यांचा हा सभापतिपदाचा राजीनामा प्रत्यक्षात नगरपरिषदेकडे प्राप्त नाही. राजीनाम्याबाबत त्या कोणाशी बरोबरी करायला जात आहेत याचेही भान त्यांना राहिलेले नाही.

(चौकट)

.. असे आरोप अशोभनीय

सिद्धी पवार यांच्या प्रभाग क्रमांक १७ मध्ये आजवर खा. उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनखाली एकूण ३७ कामे मंजूर करण्यात आलेली आहेत. पैकी २० कामे पूर्ण झालेली आहेत. नगरपरिषदेच्या वॉर्ड निधीमधून ५१ लाख ३४ हजार रुपयांची कामे झालेली आहेत. वॉर्डनिधी व्यतिरिक्त १ कोटी ८५ लाख २२ हजार रुपयांची कामे मंजूर आहेत. दोन्ही मिळून २ कोटी ३६ लाख ५६ हजार रुपयांची कामे पूर्णत्वास जात असताना, कामे होत नाहीत, कामे अडवली जातात, जादूगार जादू करतात व त्यामुळे कामे होत नाहीत असे निराधार आरोप करणे जबाबदार लोकप्रतिनिधींना शोभत नाही, असा टोलाही नगराध्यक्षा माधवी कदम यांनी लगावला आहे.