शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

बिगरशेती ? बापरे... भलतीच भीती !

By admin | Updated: July 16, 2014 22:54 IST

राज्य शासनाचा निर्णय : स्थानिक अधिकाऱ्यांना अधिकार...नागरिकांकडून स्वागत

शिरवळ : बिनशेती म्हटले की, नको ती झंजट, अशी म्हणण्याची बारी आता संपली आहे. राज्य मंत्रिमंडळाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाण्याचे हेलपाटे वाचणार आहेत. बिनशेती करण्यासाठी आता जिल्हाधिकारी यांच्या परवानगीची आवश्यकता भासणार नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे.बिनशेतीची परवानगी मिळविण्यासाठी अनेक हेलपाटे विविध विभागांमध्ये मारावे लागत असल्याने ‘बिनशेती नको रे बाबा’ अशी म्हणण्याची वेळ सर्वसामान्य नागरिकांवर येत असते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात छोट्या-छोट्या जागांसाठीही मोठ्या आर्थिक उलाढाली होतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक अक्षरश: मेटाकुटीला येतो. साधारणपणे जागा बिनशेती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, जिल्हा परिषद विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग, संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांचा स्थळपाहणी अहवाल, तलाठीचा चौकशी दाखला, वनविभाग ना हरकत पत्र जर जागेला पुनर्वसन शिक्का असेल किंवा नसेल त्यांचे ना हरकत पत्र, जर जमीन राष्ट्रीय महामार्गालगत असेल तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे ना हरकत पत्र, नगररचना विभाग, भूसंपादन विभाग आदी विभागांच्या परवानग्या आणाव्या लागतात. यावेळी नागरिकांना संबंधित परवानग्या घेताना सरकारी काम सहा महिने थांब याचा प्रत्यय येतो. यामुळे या परवानग्या मिळविताना अक्षरश: नाकीनऊ येते. एकूणच आता या सर्व प्रक्रिया स्थानिक जागीच होणार असल्याने बिनशेती जमीन करणाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. आता राज्य मंत्रिमंडळाने बिनशेतीचे अधिकार स्थानिक अधिकारी यांना देण्यात आल्याने बिनशेती करण्याची पद्धत आता सोयीस्कर सोपी झाली आहे.एकूणच राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाने सर्वसामान्य नागरिकांनी बिनशेतीच्या प्रकरणामध्ये सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. (प्रतिनिधी)