शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

बेकायदा वाळू साठा जप्त, प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 7:00 PM

वडूज : खटाव तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ या आशयाची बातमी ह्यलोकमतह्ण प्रसिद्ध झाल्यानंतर विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाईसाठी ...

ठळक मुद्देबेकायदा वाळू साठा जप्त, प्रांताधिकाऱ्यांची कारवाई लोकमतच्या वृत्तानंतर महसूल विभागाची कारवाई

वडूज : खटाव तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ या आशयाची बातमी ह्यलोकमतह्ण प्रसिद्ध झाल्यानंतर विनापरवाना वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कारवाईसाठी महसूल विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व त्यांच्या पथकाने छापे टाकून दहा ब्रास वाळूसाठा जप्त केला.याबाबतची माहिती अशी की, दहशत माजवत वाळू माफिये खुलेआम वाळू उपसा करीत असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिद्ध झाले. याची दखल घेत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी कडक कारवाईचे आदेश प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना दिले होते. त्यानुसार प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कर्मचाऱ्यांनी धाड टाकत हा वाळू साठा जप्त केला. या कारवाईचे नागरिकांतून कौतुक केले जात आहे.तालुक्यात वाळू उपसा करीत असताना वाळू माफिया व त्यांच्या हस्तकांकडून दहशत माजवली जात आहे. त्याचप्रमाणे परिसरातील शेतकरी व महिलांना देखील सातत्याने नाहक त्रास दिला जात आहे. तरी महसूल व पोलीस प्रशासनाकडून संबंधितांवर गुन्हे केव्हा दाखल होतात याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :sandवाळूSatara areaसातारा परिसर