शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

उंब्रज ग्रामपंचायत तरुणांच्या हाती!

By admin | Updated: November 5, 2015 00:12 IST

विरोधकांनीही दाखविली ताकद : भावकीच्या राजकारणाचीही पहायला मिळाली चुनूक

अजय जाधव -- उंब्रज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पक्षीय राजकारणाबरोबर येथे भावकीचेही राजकारण, समीकरण दिसून आलेच; त्याचबरोबर सर्वच पॅनेलमध्ये बहुतांशी उमेदवार हे तरुण व नवीन चेहरे दिले गेले.राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उंब्रज विकास आघाडीने १० जागा जिंकून बहुमत मिळविले. तर विरोधातील भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने ७ जागा मिळवून आपलीही ताकद दाखवून दिली.ग्रामपंचायतीची निवडणूक ही पक्षीय चिन्हावर लढली जात नाही. त्याचबरोबर ही निवडणूक समविचारी लोक व बेरजेचे राजकारण करून लढली जाते. यामुळे अनेकवेळा एकाच पक्षाचे कार्यकर्ते एकमेकाविरुद्धतही लढतात. तर एकत्र येऊन तिसऱ्या विरोधातही लढतात. अशाच पद्धतीने उंब्रज ग्रामपंचायतीची निवडणूक झाली.राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उंब्रज विकास आघाडीचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, सह्याद्रीचे संचालक हंबीरराव पाटील, पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव, सह्याद्रीचे संचालक डी. बी. जाधव यांनी केले. त्याचबरोबर काँग्रेसचे जयंत जाधव यांनीही या पॅनेलमधून आपले २ उमेदवार उभे केले व निवडून आले.याच बरोबर भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलचे नेतृत्व खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष महेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर जाधव, माजी उपसरपंच अशोक जाधव, धैर्यशील कदमांचे समर्थक विकास जाधव, विलास आटोळे, तात्या जाधव यांनी केले. निवडणुकीचे रणांगण हे अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून तयार झाले. अर्ज भरणे, काढणे यावरील चर्चेतून उमेदवाराचा प्रचार सुरू झाला. अनेकजणांनी अर्ज भरले, काहींचे अर्ज राहिले काहींनी काढले, काहींना काढण्यास भाग पाडले, आणि यात जे रुसवे, फुगवे झाले त्यांचे फटके काहींच्या विजय सुकर करून गेले. तर काहींना पराभवाला सामोरे जावे लागले.या दोन पॅनेलबरोबर भैरवनाथ जनता विकास आघाडी जनशक्ती ग्रामविकास पॅनेल हे दोन पॅनेल व अपक्षही निवडणुकीत उभे होते. अनेक ठिकाणची विजयाची समीकरणे या दोन पॅनेलमधील उमेदवार व अपक्ष यांनी बदलली आहेत. मताची विभागणीने काहींना विजय मिळवून दिला तर काहींना पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीत बहुतांशी उमेदवारांनी लाखोंचा चुराडा केला. त्यातील काही विजयी झाले, पराभूतही झाले. परंतु यानंतर निवडणुकीला सर्वसामान्य कोण उभा राहू शकणार नाही. अशी चर्चा लोकांच्यात आहे. मत मिळवणे हा उद्देश ठेवूनच प्रचारयंत्रणा काम करत असल्यामुळे विकासाचे मुद्दे भावी काळातील गावाच्या विकासाच्या योजना यावर चर्चाच झाली नाही. निवडून येणे हाच दृष्टिकोन ठेवून उमेदवारांनी मतदारराजाला वेगवेगळी आमिषे दाखवून मते मिळवण्याचे प्रयत्न झाले.सद्यस्थितीला १७ जण उंब्रज ग्रामपंचायतीचे सदस्य झाले. या सदस्यांनी विविध विकासकामे उंब्रजमध्ये खेचून आणण्यासाठी एकत्रित काम करावे व पुढील पाच वर्षांत आदर्शगाव निर्माण करावे. ऐवढीच माफक अपेक्षा ग्रामस्थांच्यातून व्यक्त होत आहे. काहींचा निसटता विजय येथील वार्ड क्र. ४ मधील जयवंत जाधव हे ३२६ मतांच्या फरकाने विजयी झाले. तर वार्ड क्र. २ मधील रवींद्र जाधव हे दहा मताने विजयी झाले तर वार्ड क्र. ३ मधील मंगल पवार या ११ मतांनी विजयी झाल्या.