Accident News Satara: पोकलँड मशिनला दुचाकीची धडक, खटावच्या युवकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:43 IST2022-06-21T14:42:42+5:302022-06-21T14:43:42+5:30

जखमीवर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Two-wheeler hits Pokland machine, Khatav youth dies on the spot | Accident News Satara: पोकलँड मशिनला दुचाकीची धडक, खटावच्या युवकाचा जागीच मृत्यू

Accident News Satara: पोकलँड मशिनला दुचाकीची धडक, खटावच्या युवकाचा जागीच मृत्यू

पुसेगाव : पुसेगाव-खटाव राज्य महामार्गावरील पुसेगाव हद्दीतील पुलाच्या कामासाठी उभ्या असलेल्या पोकलँड मशीनला दुचाकीची धडक बसून खटाव येथील युवकाचा जागीच मृत्यू झाला. महेश दशरथ चव्हाण (वय २९) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तर कपिल राजेंद्र गुंजवटे (३२, रा- खटाव) हे जखमी झाले. जखमीवर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काल, सोमवारी (दि. २०) रात्री उशिरा हा अपघात घडल्याची माहिती आहे. याबाबत पुसेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अपघात इतका भीषण होता की पॉकलेनच्या आत दुचाकी घुसली होती.

पुसेगाव-खटाव रस्त्यावर पुलाची कामे सुरू आहे. काही ठिकाणी काम पूर्ण झाले असले तरी माती, मुरूमची जाड ओरळ तसेच त्या भागात बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकाना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बऱ्याच ठिकाणी काम चालू असतानाही सूचना फलक लावण्यात आले नाही. यामुळेच ही दुर्घटना घडली.

Web Title: Two-wheeler hits Pokland machine, Khatav youth dies on the spot