Two-wheeled Dickey's cash extended | दुचाकीच्या डिकीतील रोकड लांबविली
दुचाकीच्या डिकीतील रोकड लांबविली

ठळक मुद्देदुचाकीच्या डिकीतील रोकड लांबविलीसोनवडीत महिलेची आत्महत्या

सातारा : दुचाकीच्या डिकीत ठेवलेली पाच हजारांची रोकड आणि इलेक्ट्रॉनिक मशीन चोरून नेल्याची घटना बुधवारी दुपारी प्रतापगंज पेठेत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मच्छिंद्रनाथ नामदेव सुकाळे (वय ४४, रा. प्रतापगंज पेठ) हे पिग्मी एजंट म्हणून काम करत आहेत. दुचाकीच्या डिकीमध्ये त्यांनी पाच हजारांची रोकड आणि इलेक्ट्रॉनिक मशीन ठेवली होती. अज्ञात चोरट्याने डिकी उचकटून रोकडसह मशीनही लांबवली. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

सोनवडीत महिलेची आत्महत्या

सातारा : सोनवडी, (ता. सातारा) येथे एका महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

जयश्री लहू साळुंखे (वय ३६,मूळ रा. राजापूर, ता. स सध्या रा. सोनवडी, ता. सातारा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ही घटना समोर आल्?यानंतर तालुका पोलिसांनी घटनास्?थळी धाव घेतली व पंचमाना केला. घटनेची पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Two-wheeled Dickey's cash extended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.