Two robbers arrested for threatening a sword | तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या दोघांना अटक
तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या दोघांना अटक

ठळक मुद्देतलवारीचा धाक दाखवून लुटमार करणाऱ्या दोघांना अटकचोरीचे ३३ मोबाईल जप्त : पाच गुन्ह्यांची कबुली

सातारा : ट्रक चालक, निर्जनस्थळी बसणारी जोडपी तसेच वाटसरूंना तलवारीचा धाक दाखवून लुटमार करणाºया दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून ३३ मोबाईल व सीमकार्ड, १० मेमरी कार्ड असा सुमारे १ लाख २५ हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

महेश जयराम जगदाळे (वय २५, रा. कांबळेश्वर, ता. बारामती. जि. पुणे), प्रवीण उर्फ गोट्या संजय करनोर (वय २४, रा. मठाचीवाडी, ता. फलटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, जिंती नाका, ता. फलटण येथे दोघेजण चोरीचे मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमसह तेथे सापला लावला. त्यावेळी जगदाळे आणि करनोर हे दोघे दुचाकीवरून त्या ठिकाणी आले.

पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पवारवाडी, ता. फलटण येथील पेट्रोलपंपावर तलवारीचा धाक दाखवून रोकड चोरून नेल्याची कबुली दिली. त्यांच्याजवळ ११ मोबाईल सापडले. हे मोबाईल कुठून आणलेत, अशी विचारणा पोलिसांनी केल्यानंतर आणखी धक्कादायक माहिती समोर आली.

ट्रक चालकांना अडवून त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाईल आणि रोकड चोरून नेत होते. तसेच निर्जनस्थळी फिरणाऱ्या जोडप्यांचे आणि दारूच्या नशेत फिरणाऱ्या लोकांकडून ते जबरदस्तीने मोबाईल हिसकावून घेत होते. त्यांच्याजवळ सापडलेली दुचाकी वारजे (पुणे)माळवाडी येथून चोरली असल्याची कबुली त्यांनी दिली. अत्तापर्यंत त्यांच्याकडून चोरीचे ३३ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.

या दोघांवर फलटण ग्रामीण तसेच लोणंद पोलीस ठाण्यात दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघांकडून आणखी अशा प्रकारच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून, पुढील तपासाठी या दोघांना फलटण ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


Web Title: Two robbers arrested for threatening a sword
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.