शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
4
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
5
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
6
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
7
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
8
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
9
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
10
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
11
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
12
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
14
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
15
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
16
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
17
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
18
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
19
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
20
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांची बॅटरी चोरणाऱ्या दोघांना अटक, ३६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 13:05 IST

पार्किंगमध्ये तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची बाटरी चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. किरण संजय काटे (वय २५, रा. राऊतचाळ, ता. बार्शी. जि. सोलापूर), प्रमोद काशिनाथ सकट (वय २१, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

ठळक मुद्देवाहनांची बॅटरी चोरणाऱ्या दोघांना अटक, ३६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा : पार्किंगमध्ये तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या चारचाकी वाहनांची बॅटरी चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. किरण संजय काटे (वय २५, रा. राऊतचाळ, ता. बार्शी. जि. सोलापूर), प्रमोद काशिनाथ सकट (वय २१, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बॉम्बे रेस्टॉरंट चौकामध्ये दोन युवक संशयितरित्या फिरत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सागर गवसने यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सापळा रचला. त्यावेळी पोलिसांनी काटे आणि सकट या दोघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता या दोघांनी वाहनांच्या बॅटरी चोरल्याची कबुली दिली. सुमारे ३७ हजारांचा चोरीचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केला आहे. हे दोघे सराईत असून, त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात यापूर्वी घरफोडी आणि चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे, सहायक फौजदार पृथ्वीराज, विलास नागे, ज्योतिराम बर्गे, हवालदार विनोद गायकवाड, मोहन नाचन, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धीरज महाडिक, केतन शिंदे, मयूर देशमुख, वैभव सावंत, साहेबराव साबळे यांनी सहभाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर