राष्ट्रीय महामार्गावर सोळशी फाटा येथे  दोन कारची समोरासमोर धडक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 13:47 IST2019-04-12T13:47:03+5:302019-04-12T13:47:41+5:30

गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर सोळशी फाटा येथे गुरुवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक झाली. यात कोणीही जखमी झाले नाही.

Two cars face a face-to-face in Solashi Phata on the national highway | राष्ट्रीय महामार्गावर सोळशी फाटा येथे  दोन कारची समोरासमोर धडक 

राष्ट्रीय महामार्गावर सोळशी फाटा येथे  दोन कारची समोरासमोर धडक 

ठळक मुद्देसोळशीहून येणारी कार ही भरधाव वेगाने येत होती.  यामधून चार ते पाच जण प्रवास

वेळे : गावच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर सोळशी फाटा येथे गुरुवारी सायंकाळी सव्वा सहाच्या सुमारास दोन कारची समोरासमोर धडक झाली. यात कोणीही जखमी झाले नाही. अपघातानंतर एका कारमधील प्रवाशांनी घटनास्थळावरून पलायन केले. 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करण पाटील (रा. शिळफाटा) हे आपली कार चालवत पुण्याहून साताºयाच्या दिशेने येत होते. त्याचवेळी सोळशी येथून वेळेच्या बाजूला येणारी भरधाव कार  करण पाटील यांच्या कारला धडकून दुभाजकामध्ये पलटी झाली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले.  प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की,  सोळशीहून येणारी कार ही भरधाव वेगाने येत होती.  यामधून चार ते पाच जण प्रवास करत होते. हे सर्व कोरेगाव भागातील रहिवाशी असल्याचे समजते. 
 

दीपक शिर्के (रा. घिगेवाडी), अविनाश साळुंखे (रा. पिंपोडे, ता. कोरेगाव), विरेंद्र जाधव (रा.वाई)  व अन्य दोघे असे सोळशी येथून आलेल्या कारमध्ये प्रवाशी होते. हे यातील काहीजण पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. कारमध्ये चिवडा, फरसाण आदी खाद्य पदार्थ आढळून आले. भुईंज पोलीस ठाण्यात या अपघाताची अद्याप नोंद झाली नव्हती.

Web Title: Two cars face a face-to-face in Solashi Phata on the national highway