तुषार दोशी साताऱ्याचे नवे पोलिस अधीक्षक, समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त पदी बदली
By दत्ता यादव | Updated: May 22, 2025 19:20 IST2025-05-22T19:20:18+5:302025-05-22T19:20:44+5:30
सातारा: साताऱ्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून तुषार दोशी यांची नियुक्ती करण्यात आली असून, तत्कालीन पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस ...

तुषार दोशी साताऱ्याचे नवे पोलिस अधीक्षक, समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त पदी बदली
सातारा: साताऱ्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून तुषार दोशी यांची नियुक्ती करण्यात आली असून, तत्कालीन पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे.
राज्य सरकारने २२ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी काढले असून, साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस उपायुक्त पदी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी लोहमार्ग पुणे येथून पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली करण्यात आली आहे.
तत्कालीन पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी पोलिस दलाचे कुटुंब प्रमुख म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने काम केले. त्यांनी सातारकरांच्या जनतेमध्ये एक वेगळाच ठसा उमठवला. रेकॉर्ड ब्रेक पिस्टल जप्त करणे, चोरीचे दागिने रिकव्हर करणे याशिवाय तरूण, तरूणींसाठी उंच भरारीच्या माध्यमातून अनेकांना नोकऱ्या मिळवून देणे हे आगळेवेगळे काम त्यांनी केले. जिल्ह्यातील गुंडांच्या टोळ्यांना तडीपार केले. तसेच अनेकांना मोक्का लावून सातारा जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी त्यांनी चांगले प्रयत्न केले.