साताऱ्यात उभ्या कारवर झाड कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:20 IST2019-07-27T13:20:14+5:302019-07-27T13:20:46+5:30
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास उभ्या कारवर झाड कोसळले. त्यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

साताऱ्यात उभ्या कारवर झाड कोसळले
ठळक मुद्देसाताऱ्यात उभ्या कारवर झाड कोसळलेकारचे मोठ्या प्रमाणात नुकसान
सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास उभ्या कारवर झाड कोसळले. त्यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून शहरात सतत पाऊस पडत आहे. शनिवारी सकाळीही पावसाची रिपरिप सुरूच होती. जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक कार उभी होती. या कारवरच मोठे झाड अचानक कोसळले. त्यामुळे कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
सुदैवाने कारमध्ये कोणी नव्हते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. कारवर झाड कोसळल्याचे समजताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली. सिव्हिलच्या रस्त्यावरून सुरू असणारी वाहतूकही काळी काळासाठी वळविण्यात आली.