सातारा-कास मार्गावर झाड कोसळले, वाहतूक ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 12:32 IST2025-05-26T12:31:15+5:302025-05-26T12:32:34+5:30
वादळी मुसळधार पावसामुळे कास परिसरात ठिकठिकाणी पडझडीसह नुकसानीच्या घटना

सातारा-कास मार्गावर झाड कोसळले, वाहतूक ठप्प
पेट्री : शहराच्या पश्चिमेस सातारा कासमार्गावर देवकल फाटा नजिक मुख्य रस्त्यावर मोठे झाड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना घडली नाही.
वादळी मुसळधार पावसामुळे कास परिसरात ठिकठिकाणी पडझडीसह नुकसानीच्या घटना घडत आहेत. दरम्यान याच मार्गावर दोन दिवसापूर्वी मोबाईल टॉवर पडून दोन जण जखमी तर पाच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. तसेच यवतेश्वर घाटात दरड कोसळून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
दरम्यानच आज, सातारा-कास मार्गावर झाड कोसळले वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पावसामुळे पर्यटनस्थळी जिल्ह्यात पर्यटकांची गर्दी होत आहे. अशातच कास मार्गावर झाड कोसळल्याने प्रवाशांना ताटकळत बसावे लागले.