शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चुलीच्या सरपणासाठी रात्रभर ‘खोक्यांचा प्रवास’

By admin | Updated: May 25, 2016 00:52 IST

मार्केट यार्ड परिसर : गॅस कनेक्शन नसल्याने महिलांची शोधमोहीम

साई सावंत - सातारा  -वेळ रात्री बाराची. ठिकाण मार्केट यार्ड परिसर. एकीकडं आख्खं सातारा शहर निद्रावस्थेत गेलं असताना दुसरीकडं मात्र रात्रीच्या अंधारात अनेक घडामोडी घडताना ‘लोकमत टीम’ आपल्या कॅमेऱ्यात टिपल्या. सध्याच्या युगात घरोघरी गॅस कनेक्शन पोहोचले असले तरी अजून गरीबांची चूल सरपणाशिवाय पेटत नाही, याचं जळजळीत सत्य समोर आलं. उद्याची चूल पेटविण्यासाठी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मार्केट यार्ड येथे एका ठिकाणी पडलेल्या आंब्याच्या लाकडी पेट्या उचलून नेताना एक महिला आढळली. तिच्या चेहऱ्यावर सरपण मिळाल्याचं भयमिश्रित समाधान दिसत होतं.दिवसा गर्दीनं गजबजलेला पोवईनाका रात्री ११.५० वाजता मात्र शांत वाटला. पोवई नाक्यावरून ‘लोकमत टीम’ महामार्गावरील हालचाली टिपण्यासाठी गेली. महामार्गावरून वाढे फाटा परिसरात गेल्यानंतर रात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास हा चौक जागा असल्याचे दिसले. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे अगोदरच सातारकर उकाड्याने हैराण झाले आहेत. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत चौकाचौकात गप्पांचे फड रंगलेले दिसून आले. या चौकातही काही जण चहा पीत उभे होते, तर काही जण उभ्या केलेल्या दुचाकीवर बसून गप्पा मारत होते. महामार्गावरून मोठ्या वाहनांची वाहतूक जास्त प्रमाणात सुरू असल्याचे पाहायला मिळाले.