Transfers of Tehsildars in Satara District | सातारा जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या

सातारा जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्या

ठळक मुद्देसातारा जिल्ह्यातील तहसीलदारांच्या बदल्यारणजित देसाई पुन्हा साताऱ्यात बदलून आले

सातारा : राज्य शासनाच्या वतीने शुक्रवारी राज्यातील तहसीलदारांच्या विनंती बदल्यांचे आदेश देण्यात आले. सातारा जिल्ह्यातील अर्चना पाटील, शरद पाटील, रोहिणी शिंदे, जगदीश निंबाळकर हे तहसीलदार इतर जिल्ह्यात बदलून गेले आहेत.

माण तालुक्याच्या तहसीलदारपदी चंद्रशेखर सानप, खटावच्या तहसीलदारपदी किरण जमदाडे, कोरेगावच्या तहसीलदारपदी अमोल कदम, फलटणच्या तहसीलदारपदी समीर यादव, जावळीच्या तहसीलदारपदी आर. आर. पोळ हे अधिकारी बदलून आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार अजित कुऱ्हाडे यांच्याकडे कऱ्हाड तालुक्याचा कार्यभार देण्यात आला आहे.

खटावच्या तहसीलदार अर्चना पाटील या सांगली जिल्ह्यात अप्पर तहसीलदार म्हणून बदलून गेले आहे तर जावळीचे तहसीलदार शरद पाटील हे इचलकरंजीला नवनिर्मित झालेल्या पदावर अप्पर तहसीलदार म्हणून बदलून गेले आहेत. कोरेगावच्या तहसीलदार रोहिणी शिंदे यांची पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात तहसीलदारपदी बदली झाली आहे.

सातारा जिल्ह्यात यापूर्वी सेवा बजावलेले रणजित देसाई पुन्हा साताऱ्यात बदलून आले असून, त्यांच्याकडे जिल्हाधिकारी कार्यालयातील संजय गांधी योजनेचा कार्यभार देण्यात आला आहे. दीप्ती रिठे या विभागात तहसीलदार पदाचा कार्यभार घेणार आहेत.

Web Title: Transfers of Tehsildars in Satara District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.