शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

गाड्या पंक्चर... बसस्थानकात क्रिकेट!

By admin | Updated: May 1, 2015 00:16 IST

रिक्षाचालकांची ‘चांदी’ : परिवहन कर्मचाऱ्यांचा संप दुपारनंतर मागे

सातारा : नव्या परिवहन कायद्याला विरोध करण्यासाठी परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप दुपारी साडेबारा वाजता मागे घेण्यात आला. मात्र, तत्पूर्वी कर्मचाऱ्यांनी अनेक एसटी गाड्या पंक्चर केल्याने महामंडळाचे आर्थिक नुकसान झाले, तर रिक्षावाल्यांची चांदी झाली. संप मागे घेईपर्यंत काही कर्मचाऱ्यांनी क्रिकेटचा डाव मांडला होता. परिवहन क्षेत्रात खासगीकरण वाढविणारा नवा कायदा लवकरच करणे प्रस्तावित आहे. या कायद्यानुसार परिवहन क्षेत्रात परकी थेट गुंतवणूक येऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक क्षेत्रातील परिवहन कर्मचारी संतापले असून, काही संघटनांनी संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता.तसेच नव्या कायद्यात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना जादा शिक्षेची तरतूद असल्यामुळे रिक्षाचालकांनीही संपात उतरण्याचे ठरविले होते. मात्र, कोणत्या संघटनांचा संपाला पाठिंबा आहे, हे गुलदस्त्यातच राहिले. दिवसभर रिक्षांची वर्दळ तुरळक सुरूच होती. तथापि, काही रिक्षाचालक या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचे आढळून आले. नेहमीपेक्षा जास्त भाडेआकारणी केल्याची तक्रार प्रवासी करीत होते. संपाची बातमी प्रवाशांना समजल्याने बसस्थानक ओस पडले होते. पहाटे पाच वाजल्यापासून गाड्या बसस्थानकाबाहेर जाणे बंद झाले. दुपारी साडेबारा वाजता संप मागे घेण्याचा निर्णय होईपर्यंत सात तास बसवाहतूक बंद राहिली. या काळात संपात सहभागी झालेल्या काही एसटी कर्मचाऱ्यांनी स्थानकातच क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. अनेक बसेसचे टायर पंक्चर करण्यात आल्याचे दिसून आले. बाहेरच्या आगारातील चालक-वाहकांना पंक्चर काढण्यासाठी व इतर दुरुस्तीसाठी स्थानिक मेकॅनिक मिळत नव्हता. त्यामुळे ते स्वत:च चाक खोलताना-जोडताना दिसत होते. दुपारी साडेबारानंतर मात्र परिस्थिती पूर्वपदावर आली. (प्रतिनिधी)१२५ फेऱ्या रद्दसंपात एसटीचे कामगारही सहभागी झाले होते. ज्या गाड्या परजिल्ह्यातून मुक्कामासाठी आल्या होत्या. अशा चालकांनी पहाटे पाचच्या सुमारास गाड्या नियोजित वेळेत फलाटात लावल्याही. मात्र, सातारा आगारात काही कर्मचाऱ्यांनी गाडी न लावण्यास सांगितले. त्यानंतर गाड्यांमधील हवा सोडणे, पंक्चर करणे आदी प्रकार केले. त्यामुळे पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी बारापर्यंत सुमारे सव्वाशे फेऱ्या रद्द कराव्या लागल्या.