सातारा: उंब्रज परिसरात वाहतूक कोंडी, महामार्गावर लागल्या लांबच लांब रांगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 17:18 IST2022-10-22T17:17:10+5:302022-10-22T17:18:01+5:30

आज सकाळ पासून महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी

Traffic congestion in Umbraj area, long queues on the highway satara | सातारा: उंब्रज परिसरात वाहतूक कोंडी, महामार्गावर लागल्या लांबच लांब रांगा

सातारा: उंब्रज परिसरात वाहतूक कोंडी, महामार्गावर लागल्या लांबच लांब रांगा

अजय जाधव

उंब्रज: दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने चाकरमानी मुंबई व पुणे मधून घरी निघाल्यामुळे महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाली. ही कोंडी फोडण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. तरीही ही कोंडी फुटत नसल्यामुळे उंब्रज पोलिसांनी काही कालावधीसाठी कराड बाजूकडून साताराकडे जाणारी वाहतूक थांबवून दोन्ही रस्त्यावरून वाहतूक सोडण्यास सुरुवात केली. यामुळे उंब्रज परिसरात झालेली वाहतुकीची कोंडी थोडीफार कमी झाली.

आज सकाळ पासून महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी होती. यातच रस्त्यावरील खड्डे, काही ठिकाणी सुरू असणारी कामे यामुळे वाहनधारकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. मात्र अचानक कित्येक पटीने वाढलेली वाहने व रस्त्याची दुरावस्थेमुळे ही कोंडी फुटत नव्हती.

दुपारच्या सुमारास पोलिसांनी कराड बाजूकडून सातारा जाणाऱ्या लेनवरील वाहतूक थोडया कालावधीसाठी थांबवली. अन् या मार्गावरील वाहतूक दोन्ही लेन वरून सोडली. यानंततर उंब्रज मार्गावरील वाहतूक कोंडी थोडया प्रमाणात कमी झाली.

Web Title: Traffic congestion in Umbraj area, long queues on the highway satara