Satara News: कालव्यात पोहायला गेले, पाईपमध्ये अडकून तीन कामगारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 13:27 IST2026-03-13T13:26:47+5:302026-03-13T13:27:15+5:30

कालवा तुंबला. ​​​​​पाणी बंद करून पाईपमध्ये पाहिले असता मृतदेह आढळले

Three workers died after getting stuck in a pipe while swimming in a canal Satara | Satara News: कालव्यात पोहायला गेले, पाईपमध्ये अडकून तीन कामगारांचा मृत्यू

Satara News: कालव्यात पोहायला गेले, पाईपमध्ये अडकून तीन कामगारांचा मृत्यू

आदर्की/ लोणंद (जि. सातारा) : हिंगणगाव-आदर्की रस्त्यावर सुळवस्ती येथे धोम बलकवडीच्या पोटकालव्यावर पोहण्यासाठी गेलेल्या तीन मजूर तरुणांचा सिंमेंट पाईपमध्ये अडकून बुडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी घडली. ज्योर्तिमय भगीरथी नाईक (वय २२), सतिन बिरची नाईक (३५), श्रीराम जगाई हेबरंम (२०, सर्व रा. ओडिशा) अशी मृत्यू झालेल्या कामगारांची नावे आहेत.

हिंगणगाव येथील सुळवस्तीवर पोल्ट्री फार्म आहे. त्या ठिकाणी परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात काम करतात. गुरुवारी दुपारी बारा ते दोनच्या दरम्यान हे तिघे मजूर धोम बलकवडीच्या पोटकालव्यावर पोहण्यासाठी गेले होते. कालव्यामध्ये पोहत असताना सिमेंटच्या पाईपमध्ये अचानक तिघेही अडकले. यामुळे पोट कालवा तुंबला. 

त्यामुळे पाईपमध्ये काहीतरी अडकल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर पोटकालव्याचे पाणी बंद करून पाईपमध्ये पाहिले असता तिघांचेही मृतदेह आढळले. लोणंद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title : सतारा: नहर में तैरते समय पाइप में फंसने से तीन मजदूरों की मौत

Web Summary : सतारा के हिंगणगांव के पास एक नहर में तैरते समय ओडिशा के तीन मजदूर सीमेंट के पाइप में फंस गए और डूब गए। घटना गुरुवार दोपहर को हुई। पुलिस ने आकस्मिक मौत का मामला दर्ज किया है।

Web Title : Satara: Three laborers drown in canal pipe while swimming.

Web Summary : Three laborers from Odisha drowned in a canal near Hingangaon, Satara, after getting trapped in a cement pipe while swimming. The incident occurred on Thursday afternoon. Police have registered a case of accidental death.