शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : केरळात मान्सून कधी येणार? हवामान विभागाने दिली मोठी अपडेट, तारीख सांगितली
2
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
3
आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...
4
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
5
VIDEO: १६० किमी वेग असताना सुरु केलं इन्स्टाग्राम लाईव्ह; मुंबईला येताना अपघातात कारचा चेंदामेंदा
6
मुंबई विमानतळाचा बडा अधिकारी, अमेरिकेतून मुलगा फोन लावत होता, उचलेना; घाटकोपरच्या होर्डिंगखाली पती-पत्नी सापडले
7
आजचे राशीभविष्य १६ मे २०२४; उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता
8
२३ दिवस उलटूनही 'तारक मेहता' फेम सोढीचा काहीच पत्ता नाही, वडील म्हणाले- "मुलाची वाट पाहून..."
9
इंदूरमध्ये रात्री उशिरा भीषण अपघात, पार्क केलेल्या डंपरला कार धडकली, ८ जण ठार
10
दहावी पास लेकाची कमाल; वडिलांचा डबघाईला आलेला उद्योग मालामाल, ३ हजार कोटींची उलाढाल
11
₹४३ कोटींच्या वेतन घेणाऱ्या व्यक्तीवर अझीम प्रेमजींच्या Wipro नं केला ₹२५ कोटींचा खटला; काय आहे प्रकरण?
12
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
13
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
14
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
15
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
16
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
17
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
18
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
19
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
20
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके

माजी विद्यार्थ्यांकडून तिघांना आर्थिक बळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 10:55 PM

प्रगती जाधव-पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे सैनिक स्कूलमधील तीन टॉपर विद्यार्थ्यांचे शिक्षण ...

प्रगती जाधव-पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे सैनिक स्कूलमधील तीन टॉपर विद्यार्थ्यांचे शिक्षण जवळपास थांबण्याच्या गतीवर आले. समाजमाध्यमाद्वारे आवाहन करून काही उपयोग होतो का पाहू या, असं म्हणत एक पोस्ट व्हायरल झाली आणि अवघ्या ४८ तासांत या तिन्ही मुलांचं शिक्षण पूर्ववत होणार यावर शिक्कामोर्तब झाला.याबाबत अधिक माहिती अशी, सातारा सैनिक स्कूलमध्ये शिकणाऱ्या तीन मुलांची आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे शाळेतून दाखला काढण्यासाठी अर्ज आले. शैक्षणिकदृष्ट्या पहिल्या दहामध्ये येणाºया या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचा अर्ज पाहून शाळा व्यवस्थापनालाही धक्का बसला. यातील एका विद्यार्थ्याचे वडील गवंडी आहेत, दुसºयाचे शेतकरी आणि तिसºयाचे बेस्टमध्ये चालक आहेत. या तिघांचीही परिस्थिती अगदीच बेताची असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले.त्यानंतर ले. कर्नल रणजितसिंह नलवडे यांनी सोशल मीडियावर या विद्यार्थ्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची एक पोस्ट व्हायरल केली. सैनिक स्कूलच्या सुमारे १६० विद्यार्थ्यांनी मदतीचा हात पुढे करत सुमारे ४ लाख ४६ हजार रुपये उभे केले. यातून या तिन्ही विद्यार्थ्यांचे यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरळीत व्हायला मदत झाली. समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना सैनिकी शिक्षण मिळावे, या उद्देशाने देशातील पहिली सैनिक स्कूलची स्थापना साताºयात करण्यात आली. मात्र, गेल्या काही वर्षांत शासनाकडून शाळेला येणारा निधी अनेक स्तरांवर अडकला. परिणामी शाळेत आर्थिक दुर्बल घटकातील कुटुंबांवरही हा आर्थिक ताण येऊ लागला.माय कॉस्टआॅफ पिझ्झा..!सैनिक स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांनी समाज माध्यमावरील या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘माय कॉस्ट आॅफ विकएण्ड, पिझ्झा, बर्गर..’ असा मेसेज करत त्यांनी शाळेच्या खात्यांवर पैसे जमा केले. आपल्या एक दिवसाच्या पार्टीसाठी खर्च न करता ती रक्कम त्यांनी या तीन गरजूंसाठी उपलब्ध करून दिली. माजी विद्यार्थ्यांच्या या दातृत्वाचे शाळेच्या प्राचार्या ग्रुप कॅप्टन मनीषा मिश्रा यांनीही कौतुक केले.चेकनेही मदत!देशभरात असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी एक हजारापासून अगदी २५ हजार रुपयांपर्यंत मदत केली. कोणी हे पैसे आॅनलाईन ट्रान्सफर केले. तर काहींनी याचे चेक कार्यालयात पाठवून दिले.दातृत्वाचा पुन्हा अनुभवसातारा सैनिक शाळेतून बाहेर पडणारे अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी आहेत. गतवर्षीही त्यांना असेच आवाहन केले होते. तेव्हाही त्यांनी भरभरून मदत केली. यंदाही केवळ त्यांच्या मदतीमुळे शाळेतील तीन विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं शक्य होणार आहे.- ले. कर्नल रणजितसिंह नलवडे,रजिस्ट्रार, सातारा सैनिक स्कूल