Satara: शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसह तिघे 'लाचलुचपत'च्या जाळ्यात, तीन लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 13:43 IST2026-03-11T13:42:28+5:302026-03-11T13:43:16+5:30

पदोन्नतीसाठी मागितली लाच...

Three people including the chairman of Chandrahar Patil Rural Education Institute in Khatav were arrested while taking a bribe of Rs 3 lakhs | Satara: शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसह तिघे 'लाचलुचपत'च्या जाळ्यात, तीन लाख रुपये घेताना रंगेहाथ पकडले

संग्रहित छाया

सातारा : खटाव येथील चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांसाठी तीन लाख रुपयांची लाच घेताना एका खासगी तरुणाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (दि. १०) रंगेहाथ पकडले. त्यानंतर अध्यक्षांसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मध्यस्थ खासगी व्यक्ती रवींद्र गणपत पवार (वय ३६, रा. खटाव) याला तीन लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले, तर लाच मागण्यासाठी प्रोत्साहन दिल्याने खटाव येथील चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित रामचंद्र पाटील (५९, रा. खटाव, ता. खटाव) तसेच शहाजीराजे महाविद्यालयातील ग्रंथालय परिचर अनिल सदाशिव गुजर (४२, रा. खटाव) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पदोन्नतीसाठी मागितली लाच...

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे खटाव येथील शहाजीराजे महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत. त्यांना प्राध्यापक पदावर पदोन्नती मिळावी, तसेच कमिटीचे चेअरमन म्हणून शिवाजी विद्यापीठात उपस्थित राहण्यासाठी प्रतिनिधी नियुक्तीचे पत्र देण्याच्या कामासाठी अध्यक्ष अजित पाटील यांच्या वतीने मध्यस्थ रवींद्र पवार यांनी तीन लाख रुपयांची लाच मागितली. 

यानंतर तक्रारदार यांनी यासंदर्भात १० मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिस पथकाने मंगळवारी खटाव येथे सापळा रचला. यावेळी पंचासमक्ष लाच घेताना रवींद्र पवार याला तीन लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. चौकशीत ही रक्कम अध्यक्ष अजित पाटील यांच्यासाठी घेतली जात असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे तिघांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

Web Title : सतारा: शिक्षण संस्थान के अध्यक्ष सहित तीन रिश्वत लेते गिरफ्तार

Web Summary : सतारा: शिक्षा संस्थान के अध्यक्ष और दो अन्य को 3 लाख रुपये की रिश्वत लेते हुए भ्रष्टाचार निरोधक ब्यूरो ने गिरफ्तार किया। रिश्वत प्रोफेसर के प्रमोशन के लिए थी।

Web Title : Satara Education Head, Two Others Arrested in Bribery Case

Web Summary : Satara: Education society president and two others arrested by anti-corruption bureau for accepting a bribe of ₹3 lakh. The bribe was for professor promotion.