तीन लाखांची फसवणूक करणाऱ्याला पुण्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:06 IST2021-01-08T06:06:17+5:302021-01-08T06:06:17+5:30

महाबळेश्वर : पंचवीस लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक करणाऱ्याला महाबळेश्वर ...

Three lakh fraudster arrested in Pune | तीन लाखांची फसवणूक करणाऱ्याला पुण्यातून अटक

तीन लाखांची फसवणूक करणाऱ्याला पुण्यातून अटक

महाबळेश्वर : पंचवीस लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून तीन लाखांची फसवणूक करणाऱ्याला महाबळेश्वर पोलिसांनी पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधून अटक केली.

मिलिंद किणी (रा. प्रेमलोक पार्क, पिंपरी-चिंचवड पुणे) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, महाबळेश्वर येथील सुनील भाऊ ढेबे यांना २५ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून देतो, असे आमिष दाखवून मिलिंद किणी आणि संजय बालिका (रा. औरंगाबाद) यांनी त्यांच्याकडून तीन लाख दहा हजार रुपये घेतले होते, परंतु कर्ज मंजूर न करता घेतलेले पैसे परत न दिल्याने ढेबे यांनी ऑक्टोबर महिन्यामध्ये महाबळेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप साबळे, रमेश काळे, श्रीकांत कांबळे यांच्या टीमने पुणे येथे जाऊन किणीला त्याच्या घरातून अटक केली.

Web Title: Three lakh fraudster arrested in Pune