शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

वांग नदीपात्रात ढेबेवाडीनजीक आजोबासह तीन मुली गेल्या वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 13:46 IST

सणबूर, ता. पाटण येथील दोन सख्ख्या व एक चुलत बहिणींसह आजोबा वांग नदीच्या पात्रातून वाहून गेले. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, वाहून जाणाऱ्या दोन मुलींना व आजोबांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले तर एका मुलीचा दुपारपर्यंत शोध घेण्याचे काम सुरू होते.

ठळक मुद्देवांग नदीपात्रात ढेबेवाडीनजीक आजोबासह तीन मुली गेल्या वाहून दोन मुली अन् आजोबांना वाचविण्यात यश तर तिसऱ्या मुलीचा शोध सुरू

ढेबेवाडी : सणबूर, ता. पाटण येथील दोन सख्ख्या व एक चुलत बहिणींसह आजोबा वांग नदीच्या पात्रातून वाहून गेले. गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, वाहून जाणाऱ्या दोन मुलींना व आजोबांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले तर एका मुलीचा दुपारपर्यंत शोध घेण्याचे काम सुरू होते.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सणबूर, ता. पाटण येथील शंकर रामचंद्र ताटे (वय ६२), क्षितिजा शिवाजी साठे (वय १२), स्वरांजली आनंदा साठे (वय १०), श्रावणी शिवाजी साठे (वय १०) हे कुठरे येथे बुधवारी मामाच्या गावाला गेले होते. गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तिन्ही मुली आपल्या आजोबांसमवेत कुठरेकडून सणबूरकडे वांग नदीपात्रातून चालत निघाल्या होत्या.

दरम्यान, पाण्याचा अंदाज न आल्यामुळे सर्वजण नदीतील पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले. सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर वाहून जात असल्याचे नदीकाठी कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांनी व अंघोळ करण्यासाठी पुरुषांनी त्यांना पाहिले.

त्यावेळी काही पुरुषांनी प्रसंगावधान राखत नदीपात्रात उडी घेतली व आजोबांसहित दोन मुली स्वराजंली व श्रावणी यांना वाचवून नदीपात्राबाहेर काढले. मात्र, तिसरी मुलगी क्षितिजा शिवाजी साठे ही त्यांच्या हाताला लागली नाही. ती पुढे तशीच पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेली. तिचा शोध दुपारपर्यंत घेण्याचे काम ग्रामस्थांकडून सुरू होते.

 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर