शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

परप्रांतीय प्रवाशाला लुटणाऱ्या तिघांना अटक

By दत्ता यादव | Updated: February 18, 2024 20:10 IST

भुईंज पोलिसांची कारवाई : पन्नास हजारांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा: पाचवड-वाई मार्गावरील आसले गावच्या हद्दीत परप्रांतीय प्रवाशाची बॅग जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या तिघांना भुईंज पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ५० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दरम्यान, या गुन्ह्यात एका महिलेचा समावेश असनू, तिचा पोलिस शोध घेत आहेत.

पटेल बर्रट आदिवासी (वय ३३, रा. ग्रामकुडो, ता., जि. कटणी, राज्य मध्यप्रदेश), धोला बदोसकार पारधी (वय २९, रा. बदोश लाल पारधी, पारधी मोहल्ला, ग्राम बिरुहल्ली, ता. रिठी, नितारा, जि. कटणी, मध्यप्रदेश), चनक सुनिबेक मरावी (वय २९, रा. रुनीबेग मरावी, ग्राम कुडो, जि. कटणी, मध्य प्रदेश) असे पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पाचवड-वाई मार्गावरील आसले हद्दीतील पुलाजवळ शुक्रवारी (दि. ९) रात्री आठ ते नऊच्या सुमारास एक परप्रांतीय व्यक्ती उभी होती. त्या ठिकाणी एक महिला व तिघेजण गेले. त्यांनी संबंधित परप्रांतियाला उसाच्या शेतात नेऊन त्यांच्याकडील बॅग जबरदस्तीने हिसकावून नेली. त्यामध्ये दोन मोबाइल, सोन्याची कुंडल, सोन्याचा गुरू मनी, रोख रक्कम व कागदपत्रे, असा १ लाख ६७ हजार ६९९ रुपयांचा मुद्देमाल होता.  याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात अज्ञातांवर जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरणचे पोलिस उपनिरीक्षक विशाल भंडारे, रत्नदीप भंडारे, पोलिस अंमलदार नितीन जाधव, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, किरण निंबाळकर, सागर मोहिते, राजेश कांबळे यांचे एक पथक तयार करण्यात आले. 

या गुन्ह्याचा या पथकाने पंधरा ते वीस ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणावरून संशयितांच्या ठिकाणाची अखेर या पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार   स्थानिक गुन्हे शाखा आणि भुईंंज पोलिसांच्या पथकाने वाई तालुक्यातील परखंदी येथून वरील तिघांना बुधवारी (दि. १४) रोजी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून तपास केला असता, संशयितांनी जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मोबाइल व आणखी चार मोबाइल, तसेच पिवळ्या धातूचे ४९२ कॉइन, असा सुमारे ५० हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सोन्याची बनावट नाणी सापडली.. या प्रकरणात अटक केलेल्या तिघांची पोलिसांनी चौकशी केली जात असता त्यांच्याकडे सोन्यासारखी दिसणारी बनावट नाणी सापडली. स्वस्तात सोने देतो, असे आमिष दाखवून ज्यांची फसवणूक झाली आहे. त्यांनी सातारा स्थानिक गुन्हे शाखा किंवा भुईंज पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.    

टॅग्स :satara-acसाताराCrime Newsगुन्हेगारी