गोगावलेवाडीतील काही ग्रामस्थांना जीवे मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:24 IST2021-07-19T04:24:48+5:302021-07-19T04:24:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: तालुक्यातील गोगावलेवाडी येथील लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन एकावर कुऱ्हाड उगारून शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी ...

Threats to kill some villagers in Gogavalewadi | गोगावलेवाडीतील काही ग्रामस्थांना जीवे मारण्याची धमकी

गोगावलेवाडीतील काही ग्रामस्थांना जीवे मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: तालुक्यातील गोगावलेवाडी येथील लोकांना जीवे मारण्याची धमकी देऊन एकावर कुऱ्हाड उगारून शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी चिंचणी येथील चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शैलेंद्र सावंत, प्रवीण सावंत, पप्पू सावंत, मुगुटराव सावंत अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.

याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यातून देण्यात आलेली अधिक माहिती अशी की, सुरेश श्रीरंग जाधव (वय ४७, रा.गोगावलेवाडी, ता.जि.सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शैलेंद्र मुगुटराव सावंत, प्रवीण रंगराव सावंत, पप्पू मुगुटराव सावंत, मुगुटराव यादवराव सावंत (सर्व रा.चिंचणी, ता.सातारा) या चौघांनी ‘आमच्या जागेत कोणी यायचे नाही,’ असे म्हणून सुरेश जाधव यांना धक्काबुक्की केली आणि त्यांच्या अंगावर कुऱ्हाड उगारली. याच वेळी गावातील लोकांना चौघा संशयितांनी शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सुरेश जाधव यांनी तक्रार दाखल केल्यानंतर चौघांवर गर्दी जमविणे, मारामारीप्रकरणी गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस नाईक शिंदे करत आहेत.

Web Title: Threats to kill some villagers in Gogavalewadi