सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत बंडखोरांना हालचाल करता येऊ नये, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आयत्या वेळी एबी फॉर्म देण्याची धोरण ठेवले आहे. भाजपनेते व ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी हेलिकॉप्टरमधून एबी फॉर्म आणल्याची मंगळवारी दिवसभर चर्चा रंगली आणि त्याविषयीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाला होता.जिल्ह्यात भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षामध्ये गत चार-पाच दिवसांपासून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तेव्हापासून इच्छुकांना उमेदवारांची यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा लागली होती. जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची उमेदवारीबाबत खलबते सुरू असून यादी जाहीर गेल्यास पत्ता कट झालेले नाराज बंडखोरी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी यादी जाहीर होणार असून त्याच वेळी एबी फॉर्म दिले जाणार आहेत.दरम्यान भाजपाचे एबी फॉर्म सोमवार, दि. १८ रोजी जिल्हाध्यक्षांकडे आल्याचे एकीकडे सांगण्यात येत होते, तर दुसरीकडे मंत्री जयकुमार गोरे हेलिकॉप्टरमधून एबी फॉर्म घेऊन आल्याचे व्हिडिओ व्हायरल हाेऊ लागल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्येही याची जोरदार चर्चा होती.
भाजपच्या बैठकीत महेश शिंदे यांची एन्ट्री...साताऱ्यातील एका अलिशान हॉटेलमध्ये भाजपाच्या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यामध्ये खासदार उदयनराजे भोसले, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, माजी आमदार मदन भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. विशेष म्हणजे या बैठकीला काही वेळ शिंदेसेनेचे आमदार महेश शिंदे हेही येऊन गेले. या बैठकीतही उमेदवारीबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, नेमकी काय चर्चा झाली, याविषयी शिंदे यांचा दुजोरा मिळाला नाही.
Web Summary : Satara BJP leaders reportedly used a helicopter to deliver crucial AB forms for the Zilla Parishad elections, sparking discussions. Candidates anxiously await final lists amid fears of rebellion. A BJP meeting saw unexpected attendance by a Shiv Sena MLA.
Web Summary : सतारा में भाजपा नेताओं द्वारा जिला परिषद चुनावों के लिए हेलीकॉप्टर से एबी फॉर्म लाने की चर्चा है। बगावत के डर से उम्मीदवार अंतिम सूची का बेसब्री से इंतजार कर रहे हैं। भाजपा की बैठक में शिवसेना विधायक भी शामिल हुए।