Satara: यवतेश्वर घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच, अपघाताचा धोका; तत्काळ उपाययोजनाची मागणी

By दीपक शिंदे | Published: August 5, 2023 03:57 PM2023-08-05T15:57:23+5:302023-08-05T15:59:07+5:30

झुडपासह दगडी रस्त्यावर : दरड कोसळते तेथून काही अंतरावरच घरे वास्तव्याला 

The landslides collapsed continues at Yavateshwar Ghat in Satara, risk of accident | Satara: यवतेश्वर घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच, अपघाताचा धोका; तत्काळ उपाययोजनाची मागणी

Satara: यवतेश्वर घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच, अपघाताचा धोका; तत्काळ उपाययोजनाची मागणी

googlenewsNext

प्रियंका चव्हाण

पेट्री : शहराच्या पश्चिमेस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातारा-कास मार्गावर आज, शनिवारी पहाटे यवतेश्वर घाटात दरड कोसळून छोटी- मोठी दगडे रस्त्यालगत पडली. वाहतुकीत कोणताही अडसर होत नसला तरी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. जेथून दरड कोसळली त्या ठिकाणाहून काही अंतरावरच घरे आहेत. त्यामुळे दुर्घटना घडण्याआधीच तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

आत्तापर्यंत घाटात चार ठिकाणी तीन ते चार वेळा दरड कोसळली आहे. शनिवारी सकाळी मोठ्या प्रमाणात मुरूम, माती, दगडे खाली ढासळत आली आहेत. मोठ्या प्रमाणावर दगडं झुडूपांसह रस्त्यावर पडल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका संभवतो आहे. 

जागतिक वारसास्थळ कास पठार परिसरात पर्यटकांची रेलचेल सुरू आहे. सकाळी घाटाच्या प्रारंभीच रस्त्यावर अल्प प्रमाणात ढासळलेली माती, दगडे संबंधित विभागाने हटवावी, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात यवतेश्वर घाटात दरडी कोसळण्याची घटना वारंवार घडत असते.

Web Title: The landslides collapsed continues at Yavateshwar Ghat in Satara, risk of accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.