Satara Crime: शाळकरी मुलीवर अत्याचार; मुख्याध्यापकाला २० वर्षे शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 12:41 IST2025-12-17T12:41:34+5:302025-12-17T12:41:54+5:30
शाळेतील प्रयोगशाळा व हॉलमध्ये वेळोवेळी अत्याचार केला

Satara Crime: शाळकरी मुलीवर अत्याचार; मुख्याध्यापकाला २० वर्षे शिक्षा
महाबळेश्वर (जि. सातारा) : तालुक्यातील एका शाळेतील १५ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संबंधित शाळेचा तत्कालीन मुख्याध्यापक दिलीप रामचंद्र ढेबे (वय ५५) याला वाई येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून २० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा व २५ हजारांचा दंड ठोठावला.
आरोपी दिलीप ढेबे हा महाबळेश्वर तालुक्यातील एका शाळेत सन २०२० ते २ मार्च २०२१ या कालावधीत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होता. त्यावेळी शाळेमध्ये निर्भया पथकाचा कार्यक्रम होता. मुलींसोबत कोणी गैरकृत्य करीत असेल तर अमुक नंबरवर संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले होते.
एका मुलीने या प्रकाराची माहिती महाबळेश्वर पोलिसांना दिली. त्यानंतर महिला दिनी ८ मार्च २०२१ रोजी महाबळेश्वर पोलिस ठाण्यात आरोपी मुख्याध्यापक दिलीप ढेबे याच्यावर ‘पोक्सो’अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. जवळीक साधण्याच्या हेतूने वारंवार विनयभंग केला, तसेच शाळेतील प्रयोगशाळा व हॉलमध्ये वेळोवेळी अत्याचार केला, अशी तक्रार पीडित मुलीने दिली होती.