शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

Satara: कृष्णा नदीपात्रातील ‘वीर मारुती’ मंदिराचा भराव उद्ध्वस्त!, डागडुजीची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 12:54 IST

संजय पाटील कऱ्हाड : येथील कृष्णा नदीपात्रात असलेल्या वीर मारुती मंदिराच्या पायाचा भराव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. पायाचे दगड ...

संजय पाटीलकऱ्हाड : येथील कृष्णा नदीपात्रात असलेल्या वीर मारुती मंदिराच्या पायाचा भराव पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. पायाचे दगड निखळले असून, पाण्याच्या प्रवाहाबरोबर हे दगड वाहून गेले आहेत. त्याबरोबरच मंदिराभोवती दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडले असून, त्यामुळे भविष्यात मंदिराला मोठा धोका निर्माण होणार आहे.कृष्णा नदीपात्रात प्रीतीसंगमापासून पूर्वेला वीर मारुतीचे मंदिर आहे. त्यालाच ‘मढ्या मारुती’ म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर पूर्णपणे पात्रात आहे. त्यामुळे पावसाळ्यात नदीची पाणीपातळी वाढल्यानंतर तसेच टेंभू प्रकल्पात पाणी अडवल्यानंतर हे मंदिर पाण्यात जाते. वर्षातील किमान आठ ते नऊ महिने हे मंदिर पाण्यात असते. त्यामुळे भाविकांना मंदिरापर्यंत जाता येत नाही. मात्र, सध्या नदीची पाणीपातळी पूर्णपणे खालावली आहे. नदीचे पाणी सैदापूरच्या बाजूने प्रवाहित होत असून, वाळवंट पूर्णपणे रिकामे झाले आहे. त्यामुळे या मंदिरात भाविक दर्शनासाठी जात आहेत.नदीची पाणीपातळी खालावल्यामुळे या मंदिराचा दगडी भराव मोकळा झाला असून, या भरावाची झालेली दुर्दशा दिसून येत आहे. भरावाचे दगड पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले आहेत. त्यामुळे पाया पूर्णपणे खचला आहे. दोन्ही बाजूला मोठे खड्डे पडले आहेत. त्या बाजूचे सिमेंटही उखडले असून, हा पाया पुन्हा भरून मजबुतीकरण न केल्यास भविष्यात मंदिराला धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.

१८३८ मध्ये उभारले मंदिर

  • कृष्णा नदीतील वाळवंटात सैदापूर बाजूला १८३८ मध्ये या मंदिराची उभारणी करण्यात आली होती.
  • राघोपंत आपटे यांनी नारायण रामचंद्र कुर्लेकर, विठोबा अण्णा दप्तरदार, हरीभट बापूभट वळवडे यांच्या सहकार्याने हे मंदिर बांधले.
  • दगडी चिरेबंदी असलेले हे मंदिर खोडशीच्या धरणानंतर नदीचा प्रवाह बदलल्यामुळे कऱ्हाडच्या वाळवंटात आले.
  • पुरामुळे हानी होऊ नये, अशी योजना मंदिर बांधणीवेळी केली आहे. मात्र, सध्या या मंदिराच्या भरावाचे दगड निखळले आहेत.

वीर मारुती तथा ‘मढ्या मारुती’कृष्णा नदीपात्रात असलेल्या या मंदिराजवळच पूर्वी दहन संस्कार केले जात होते. त्यामुळे त्याला ‘मढ्या मारुती’ या नावाने ओळखले जात होते. मात्र, बाबुराव गोखले यांनी मित्र मंडळाच्या सहाय्याने त्याला ‘वीर मारुती’ असे प्रयत्नपूर्वक म्हणण्यास सुरूवात केली. पुढे तेच नाव प्रचलित झाले.

नैसर्गिक आपत्तीमुळे कृष्णा नदीतील वीर मारुती मंदिराच्या पायाचा भराव खचला आहे. दगड निखळले आहेत. प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी मंदिराच्या डागडुजीसाठी प्रयत्न करावेत. तसेच मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठीही पुढाकार घेणे गरजेचे आहे. - प्रमोद पाटील, सामाजिक कार्यकर्ते, कऱ्हाड

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडriverनदीTempleमंदिर