Satara: आई-वडिलांचे भांडण सोडवायला गेला, बापाने मुलावर बंदुकीतून छरा झाडला

By संजय पाटील | Updated: April 11, 2024 17:23 IST2024-04-11T17:22:06+5:302024-04-11T17:23:16+5:30

मुलगा जखमी; बापाला अटक

The father shot the boy with a gun when he went to settle the quarrel between his parents in karad satara | Satara: आई-वडिलांचे भांडण सोडवायला गेला, बापाने मुलावर बंदुकीतून छरा झाडला

Satara: आई-वडिलांचे भांडण सोडवायला गेला, बापाने मुलावर बंदुकीतून छरा झाडला

कऱ्हाड : आई-वडिलांचे भांडण सुरू असताना ते सोडविण्यासाठी गेलेल्या मुलावर बापाने बंदुकीतून छरा झाडला. त्यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला. शहरातील मुजावर कॉलनीत बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत आईने दिलेल्या फिर्यादीवरुन गुरूवारी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फारुख मुसा शेख (वय ४५, रा. मुजावर कॉलनी, कऱ्हाड ) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर छरा लागून वसिम फारुख शेख (वय २१) हा गंभीर जखमी झाला आहे. याबाबत हसीना फारुक शेख यांनी कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मुजावर कॉलनीत राहणारा फारुख शेख हा वारंवार पत्नी हसीना यांना शिविगाळ, दमदाटी करुन मारहाण करीत होता. बुधवारी रात्रीही त्याने हसीना यांच्याशी वाद घातला. त्यावेळी मुलगा वसीम याने भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला असता फारुखने चिडून जावून त्याच्यावर  बंदुकीतून छरा झाडला.

छरा लागल्यामुळे वसिम जखमी झाला. जखमी वसिमवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

Web Title: The father shot the boy with a gun when he went to settle the quarrel between his parents in karad satara