शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण संस्कृतीचा बाज असणारी बैलगाडी अडगळीत.., बैलं राहिली शर्यतीपुरतीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2022 16:34 IST

झुंजूमुंजू झालं, चल हे सर्जा-राजा अशी साद.. बैलगाडीच्या चाकांची खडखड आणि बैलाच्या गळ्यातील घुंगराचा मंजुळ आवाज झाला दुर्मीळ

कुडाळ : झुंजूमुंजू झालं, चल हे सर्जा-राजा अशी साद.. बैलगाडीच्या चाकांची खडखड आणि बैलाच्या गळ्यातील घुंगराचा मंजुळ आवाज आता फारच दुर्मीळ ऐकायला मिळतो आहे. ग्रामीण भागातील शेतकरी राजाही आता आधुनिक झाला आहे. पूर्वीच्या काळात शेतीच्या कामासाठी पशुधनावर ज्याची मदार होती, त्याची जागा आता यंत्राने घेतली आहे. यामुळे पहाटेच्या प्रहरी सर्जा-राजाच्या जोडीसंगे जाणारी बैलगाडीही आता दुरापास्त झालेली आहे.बदलत्या दुनियाबरोबर सर्वच क्षेत्रांत बदल घडून येत असून, ग्रामीण भागही याला अपवाद नाही. पारंपरिक पद्धतीचा साज आता यामुळे हळूहळू कमी होत चालला आहे. जिथं शेतीच्या प्रत्येक कामात बैलजोडी, बैलगाडीची मदत व्हायची, त्याची जागा मात्र आता यंत्राने घेतली आहे.एक काळ असा होता, की गावात गाडीवान बैलगाडी आणि बैलाची जोडी म्हणजे मोठा मान असायचा. या गाडीवर आणि बैलाच्या जोडीवरच सारा संसार चालत होता. तेव्हा कुठेच मोटारगाडी नव्हती. गावाला जायचं म्हटलं की सर्वांनाच या गाडीचा आधार असायचा. कोण आजारी पडलं काय किंवा कुणाच्या लग्नाचं वऱ्हाड न्यायचं म्हटलं तर ही बैलगाडीच असायची. दूरवरच्या प्रवासही या गाडीनेच व्हायचा. यात मदत व्हायची ती बैलजोडीची अन् गाडीवाल्याचीच.आज मात्र कालपरत्वे बदल घडून यंत्राचे युग आले आहे. या बैलगाडीच्या चाकाची जागा आता मोटारगाडीने घेतली आहे. दूरच्या प्रवासासाठी आता याचीच मोठी मदत होत आहे. पूर्वी मात्र प्रवासाबरोबरच, शेतीच्या कामालाही बैलगाडीशिवाय पर्याय नसायचा; पण आज याची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. प्रत्येकाच्या बांधावर पोहोचायला लागला आहे, हे जरी खरं असलं तरी अडचणीच्या ठिकाणी मात्र आजही बैलगाडीला तितकंच महत्त्व आहे.काळाबरोबर आपण बदललो असलो तरी जुनं ते सोनं हे मात्र विसरता कामा नये. आज मात्र आपल्याला हा पारंपरिक ग्रामीण साज वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून पाहायला मिळत असून, यातून खऱ्या अर्थाने या काळातील ग्रामीण संस्कृतीचा साज यांची ओळख नव्या पिढीला होण्यास मदत होणार आहे.

पूर्वीच्या काळी बैलगाडी हे एकमेव प्रवासाचे साधन होते. पशुधनावरच शेतीच्या कामाची मदार होती. आता शेतीचेही यांत्रिकीकरण झालेले आहे. यामुळे गावामध्ये बैलजोड्या नाहीत. बैलगाडीची जागाही यंत्राने घेतली आहे. यामुळे काळाच्या ओघात पूर्वीच्या काळातील ही बैलजोडी आणि गाडी मागे पडली आहे. यामुळे आता गावात ठराविक शेतकऱ्यांकडेच पारंपरिक यंत्रणा अजूनही पाहायला मिळत आहे. -विश्वास नवले, शेतकरी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरBull Cart Raceबैलगाडी शर्यतFarmerशेतकरी