नीरा नदीमध्ये आढळलेला मृतदेह पुण्यातील युवतीचा, आत्महत्या की घातपात?; पोलिसांकडून तपास सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 18:45 IST2023-01-19T18:44:55+5:302023-01-19T18:45:18+5:30

युवतीची ओळख पटविण्यात शिरवळ पोलिसांना ७२ तासात यश

The dead body found in the Neera river is that of a young woman from Pune, Investigation started by the police | नीरा नदीमध्ये आढळलेला मृतदेह पुण्यातील युवतीचा, आत्महत्या की घातपात?; पोलिसांकडून तपास सुरु

नीरा नदीमध्ये आढळलेला मृतदेह पुण्यातील युवतीचा, आत्महत्या की घातपात?; पोलिसांकडून तपास सुरु

मुराद पटेल

शिरवळ : नीरा नदीमध्ये आढळलेल्या युवतीची ओळख पटविण्यात शिरवळ पोलिसांना ७२ तासात यश आले. नेहा शरद पिलाणे (वय २०, मूळ रा.वांगणी ता.वेल्हा जि.पुणे, सध्या रा.जयनाथ चौक,धनकवडी,पुणे) असे मृत युवतीचे नाव आहे. संबंधित युवतीने आत्महत्या केली आहे की घातपात झाला याबाबतचा तपास शिरवळ पोलिसांकडून सुरु आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिदेंवाडी ता.खंडाळा येथील नीरा नदीच्यापाञात रविवार (दि.१५) मकर संक्रांतीदिवशी एका युवतीचा सडलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला होता. याबाबतची शिरवळ पोलिस स्टेशनला आकस्मिक मयत म्हणून नोंद झाली होती. संबंधित युवतीची ओळख पटविण्याकरीता पोलिसांनी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले होते. 

पोलिस निरीक्षक नवनाथ मदने यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक वृषाली देसाई, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल बारेला, पोलिस अंमलदार नितीन महांगरे, प्रशांत वाघमारे, दिपक पालेपवाड यांच्या पथकाला तपासादरम्यान संबंधित युवती ही पुणे शहरातील नेहा पिलाणे असल्याची माहिती मिळाली. नेहा बेपत्ता असल्याची नोंद पुणे शहर येथील सहकारनगर पोलिस स्टेशनला होती.

शिरवळ पोलिसांनी याबाबत नातेवाईकांशी संपर्क साधला असता तो मृतदेह नेहा पिलाणे हिचा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर नेहाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वृषाली देसाई करीत आहेत.

Web Title: The dead body found in the Neera river is that of a young woman from Pune, Investigation started by the police