शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Satara News: आरटीओ पथकास चुकवून कार चालक सुसाट, पाठलाग करुन पकडून चालकास केला दोन लाखांचा दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 17:21 IST

वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द

अजित जाधवमहाबळेश्वर : आरटीओ पथकास चुकवण्यासाठी महाबळेश्वरमधील गल्लीबोळातून सुसाट कार पळविण्याऱ्या एकास ताब्यात घेतले. याप्रकरणी संबंधित कारचालक अजमुद्दीन वलगे याला १ लाख ९० हजार रुपयांचा दंड केला. तसेच वाहन चालविण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द केला. ही कारवाई आज, शनिवारी प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक निरीक्षक आफरी मुलाणी यांनी केली.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सातारा उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांचे फिरतेपथक महाबळेश्वरमध्ये दाखल झाले आहे. हे पथक दर महिन्याला शहर व तालुक्यात प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वाहन कर, वाहन परवाना, वाहन नोंदणी, वाहन पासिंग अशी दर महिन्याला कागदपत्रे तपासणी करत असते. पर्यटनस्थळ असल्यामुळे तालुक्यात काळी पिवळी ट्रॅक्सी व टुरिस्ट ट्रॅक्सी जवळपास ८०० वाहने आहेत. यामध्ये कोणाच्या वाहनाचे कागदपत्रे अपुरे तर कोणी परवाना भरलेला नाही. याची आलेल्या अधिकाऱ्याकडे संपूर्ण कुंडली असल्याने शहरात आरटीओ आलेले कळताच वाहनचालक, मालक वाहने लपविण्याचा प्रयत्न करतात.इराणी पेट्रोल पंपाजवळ आज, सकाळच्या सुमारास परिवहन विभागाचे वाहन पाहताच कार क्रमांक (एमएच ११ बीडी ८२८२) चालकाने पळ काढला. वाहतूक निरीक्षक आफरीन मुलाणी यांना संशय आल्यामुळे त्यांनी या कारचा पाठलाग केला. चालकाने शहराच्या गल्लीबोळातून कार पळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिली. धडकेत कारचा पुढील टायर पंक्चर झाल्याने वेग कमी झाला. यावेळी पाठीमागून आलेल्या वाहतूक निरीक्षक आफरीन मुलाणी यांनी चालकास पकडले. त्याच्याकडे अधिक चौकशी करुन त्याला महाबळेश्वर आगारात नेले. तेव्हा कारचा सहा वर्षे वाहन कर थकीत होता. यामुळे चालकाला कारसह ताब्यात घेतले. वाहनाला तब्बल १ लाख ९० हजार रुपयांचे चलन दिले. तसेच कारचालकाचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द केला. वाहन जप्त करण्यात आले. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक उपनिरीक्षक तेजस्विनी गावडे उपस्थित होत्या.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानRto officeआरटीओ ऑफीस