टेम्पोची ट्रकला धडक; कर्नाटकचा चालक जखमी, पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 14:07 IST2019-03-29T14:06:54+5:302019-03-29T14:07:52+5:30
पुणे-बेंगलोर महामार्गावर भरधाव टेम्पोने ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत टेम्पोचालक मंजुनाथ (वय २८, रा. कर्नाटक) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टेम्पोची ट्रकला धडक; कर्नाटकचा चालक जखमी, पुणे-बेंगलोर महामार्गावर अपघात
वेळे : पुणे-बेंगलोर महामार्गावर भरधाव टेम्पोने ट्रकला पाठीमागून दिलेल्या धडकेत टेम्पोचालक मंजुनाथ (वय २८, रा. कर्नाटक) हा गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एक मालट्रक (टीएन ५२ के ०५६२) पुण्याच्या दिशेने निघाला होता. ट्रक वेळे (ता. वाई) गावानजीक आल्यानंतर पाठीमागून आलेल्या भरधाव टेम्पोने (केए ५२ ए ६१७२) ने ट्रकला जोरदार धडक दिली.
या अपघातात टेम्पोचालक मंजुनाथ याचे दोन्ही पाय गाडीच्या केबिनमध्ये अडकल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. तर टेम्पोचेही मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमी चालकास उपचारासाठी तातडीने सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद भुर्इंज पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस उपनिरीक्षक मनोज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.