शिक्षिकेला ढकलून गळ्यातील चार लाखांची चेन हिसकावली, साताऱ्यात सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रिय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:31 IST2025-03-19T13:31:34+5:302025-03-19T13:31:50+5:30

सातारा : सातारा शहरात सोनसाखळी हिसकावणारे चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, एका शिक्षिकेला पाठीमागून येऊन ढकलून देऊन त्यांच्या गळ्यातील ...

Teacher pushed chain worth Rs 4 lakh snatched from her neck, gold chain thieves active again in Satara | शिक्षिकेला ढकलून गळ्यातील चार लाखांची चेन हिसकावली, साताऱ्यात सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रिय

शिक्षिकेला ढकलून गळ्यातील चार लाखांची चेन हिसकावली, साताऱ्यात सोनसाखळी चोरटे पुन्हा सक्रिय

सातारा : सातारा शहरात सोनसाखळी हिसकावणारे चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, एका शिक्षिकेला पाठीमागून येऊन ढकलून देऊन त्यांच्या गळ्यातील तब्बल ४ लाख २२ हजारांची चेन हिसकावून नेली. ही घटना दि. १७ रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास राजवाड्यावरील राजधानी टाॅवरजवळ घडली.

आशादेवी अजित साळुंखे (वय ४८, रा. नागठाणे, ता. सातारा) या शिक्षिका आहेत. सोमवार, दि. १७ रोजी दुपारी त्या राजवाड्यावरील राजधानी टाॅवर्सजवळून चालत निघाल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून एक अनोळखी तरुण आला. त्याने तोंडाला काळा रुमाल बांधला होता. अचानक त्याने साळुंखे यांना ढकलून दिले. त्यानंतर चोरट्याने काही क्षणात त्यांच्या गळ्यातील ४ लाख २२ हजार रुपयांची ६५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून नेली. 

या प्रकारानंतर त्यांनी आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत चोरटा तेथून पळून गेला. भर वर्दळीच्या ठिकाणी एका शिक्षिकेला अशाप्रकारे ढकलून त्यांची चेन चोरून नेल्याने महिलांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिथे ही घटना घडली. त्या ठिकाणी पंचपाळी मंदिर आहे. या ठिकाणी दर्शनासाठी महिला येत असतात. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सीसीटीव्हीलाही देताहेत चकवा..

सातारा शहरामध्ये अधूनमधून सोनसाखळी चोरटे सक्रिय होत आहेत. एकदा चोरी झाली की पुन्हा दोन महिने सोनसाखळी चोरी होत नाही. दोन महिन्यांनंतर पुन्हा चोरटे सक्रिय होत आहेत. शहरात बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही असतानाही चोरटे पोलिसांच्या हाती लागत नाहीत. काही चोरटे दुचाकीवरून येऊन मंगळसूत्र हिसकावून जाताहेत तर काही चालतही दागिने हिसकावताहेत.

Web Title: Teacher pushed chain worth Rs 4 lakh snatched from her neck, gold chain thieves active again in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.