शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

मलकापुरातील करआकारणी प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: April 10, 2015 00:28 IST

नागरिकांच्या हक्कासाठी योग्य त्या न्यायमंडळाकडे न्याय मागण्यासाठी तयार असल्याचा इशारा

कऱ्हाड : मलकापूर नगरपंचायतीने कर आकारणी करण्यासाठी केलेली प्रक्रियाच घाईगडबडीत व बेकायदेशीर केली आहे. विधीग्राह्य कायदेशीर तरतुदींचा भंग केला आहे. या गडबडीच्या प्रक्रियेमुळे नागरिकांच्या नैसर्गिक न्याय हक्कांचीच पायमल्ली झाली आहे. ही करआकारणी २०१५-२०१६ या सालाकरिता लागू करावी, यासाठी नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. नगरपंचायतीने २०१५-१६ या वर्षापासून चतुर्थ श्रेणी कर आकारणीचा ठराव केला होता. त्यानुसार प्रक्रियाही सुरू केली होती. मात्र नगररचना विभागाने २०१४-१५ या वर्षापासूनच कर आकारणी करणे कायद्याने बंधनकारक असल्याचे कळविल्याने स्थानिक प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. नागरिकांना विचार करण्यासाठी व आपले म्हणणे मांडण्यासाठी नवीन करआकारणी २०१५-१६ वर्षासाठी लागू करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. तसे न झाल्यास नागरिकांच्या हक्कासाठी योग्य त्या न्यायमंडळाकडे न्याय मागण्यासाठी तयार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)