तंटामुक्तीत मल्हारपेठ, पापर्डे नापास

By Admin | Updated: September 15, 2014 00:12 IST2014-09-14T20:37:50+5:302014-09-15T00:12:31+5:30

जिल्हास्तरीय समितीच्या निरीक्षणावरून दिसून येत आहे़

Tantamukti Malharpeth, Papparde Napaat | तंटामुक्तीत मल्हारपेठ, पापर्डे नापास

तंटामुक्तीत मल्हारपेठ, पापर्डे नापास

मल्हारपेठ : महात्मा गांधी तंटामुक्तग्राम अभियानाच्या जिल्हास्तरीय समितीने मल्हारपेठ, पापर्डे गावांची तपासणी केली़ त्यामध्ये ही दोन गावे अपात्र ठरली आहेत़ महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात पाटण तालुका अव्वल स्थानावर होता़ तत्कालीन पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे यांनी तालुकाभर तंटामुक्त अभियानाचा जागर केला होता़ त्यामुळेच जिल्ह्यात पाटण तालुका अग्रेसर राहिला; मात्र सध्याची स्थिती बिकट असल्याचे जिल्हास्तरीय समितीच्या निरीक्षणावरून दिसून येत आहे़
जिल्हास्तरीय समितीमधील कोल्हापूर येथील पोलीस निरीक्षक सी़ बी़ भालके, नायब तहसीलदार डी़ डी़ कोळी, सरकारी वकील एस़ एस़ गुजर, रंजित कालेकर यांनी मल्हारपेठ व पापर्डे गावच्या तंटामुक्त समितीची व त्यांच्या दप्तरांची तपासणी केली असता अनेक तंटे दिवाणी, फौजदारी व इतर एकत्रच लिहिल्याचे आढळून आले़ तंट्यांचे कारण केले नाही़ तसेच अहवालही नाही़ संबंधित अधिकाऱ्यांकडे तंटा मिटल्याचा अहवाल नाही़ स्थानिक पातळीवर मनाप्रमाणे कमिटीने काम केल्याने २०१३-१४ चे कामकाज असमाधानकारक असल्याचे दिसून आल्याने या जिल्हा समितीने मल्हारपेठ, पापर्डे ही दोन गावे नापास केली आहेत़ त्यामुळे या गावाडे प्रशासनाने पुन्हा लक्ष केंद्रीत करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)

Web Title: Tantamukti Malharpeth, Papparde Napaat