शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यातील कोविड सेंटरला खडा पहारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असून, कोरोना सेंटरवर सध्या परिस्थिती कशी आहे याचा ‘लोकमत’ने रविवारी रियालिटी चेक ...

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असून, कोरोना सेंटरवर सध्या परिस्थिती कशी आहे याचा ‘लोकमत’ने रविवारी रियालिटी चेक केला असता या दोन्ही कोरोना सेंटरवर खडा पहारा असल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नव्हे, तर कोरोना सेंटरमध्ये रुग्णाशिवाय कोणालाही प्रवेश दिला जात नव्हता.

जिल्ह्यात गतवर्षी सारखी यंदाही परिस्थिती उद्भवण्याची चिन्हे आहेत. हळूहळू कोरोना सेंटर रुग्णांनी हाऊसफुल होऊ लागले आहेत. रुग्णांची काळजी घेण्याबरोबरच बाहेरच्या व्यक्तीशी संपर्क येऊ नये म्हणून कोरोना सेंटरमध्ये नेमकी परिस्थिती काय आहे, याची ‘लोकमत’ने रविवारी प्रत्यक्षात जाऊन माहिती घेतली. त्यावेळी सातारा बसस्थानकात शेजारी असणाऱ्या जम्बो कोरोना सेंटरमध्ये बाहेर प्रवेशद्वाराजवळच दोन मुली रिसेप्शनिस्ट म्हणून काम करीत असल्याच्या पाहायला मिळाल्या. या मुली आतमध्ये ये-जा करणाऱ्यांना चौकशी करतात. रुग्णाशिवाय आतमध्ये कोणालाही सोडत नाहीत. नातेवाइकाचे नाव नोंद करून त्यांना बाहेर बसावे, अशा सूचना करतात. ‘लोकमत’च्या प्रस्तुत प्रतिनिधीने आपली ओळख न सांगता थेट कोविड सेंटरमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तेथील मुलीने त्यांना अडविले आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही. कोणालाही भेटता येणार नाही. आपण इथेच थांबा असे त्यांना सांगण्यात आले. जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये हीच परिस्थिती होती. तेथेही कोरोना सेंटरच्या प्रवेशद्वाराजवळ महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. या महिला आतमध्ये कोणालाही सोडत नव्हत्या. एक तर कोरोना सेंटरमध्ये जाण्यासाठी कोणी धजावत नाही. मात्र, नकळत काहीजण नातेवाइकांना पाहण्यासाठी जाण्याचा प्रयत्न करतात, अशा रुग्णांना या महिला सुरक्षा कर्मचारी अडवत होत्या.

चौकट: गेटवरच नाव नोंदणी

रुग्णवाहिकेतून कोरोनाबाधित पेशंटला सेंटरमध्ये आणल्यानंतर त्याची प्रवेशद्वाराजवळच नाव नोंदणी करून रुग्णाला आतमध्ये नेले जाते. सोबत असलेला नातेवाइकाला तुम्ही घरी जावा असा सल्ला दिला जात होता. सकाळी आणि संध्याकाळी रुग्णाची प्रकृती कशी आहे, हे सांगण्यासाठी डॉक्टर प्रवेशद्वाराच्या बाहेर येतात. मात्र, आतमध्ये कर्मचारी, डॉक्टर यांच्याशिवाय कोणीही जात नव्हते.

चौकट : सिव्हिलमध्ये असणाऱ्या कोरोना सेंटरमध्ये तर कोणीच फिरकत नाही. नागरिकांमध्ये मुळात कोरोनाबाबत अद्यापही भीती आहे. त्यामुळे मुद्दामहून कोणी कोरोना सेंटरमध्ये फिरकत नाही. केवळ कोरोना सेंटरचा फलक वाचल्यानंतर लोकं तिकडे फिरकतही नाहीत; पण काहीजण रुग्णांना बघण्याच्या निमित्ताने कोरोना सेंटरमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात. अशा लोकांना महिला सुरक्षारक्षक अडवीत होत्या.

कोट : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोरोना सेंटरमध्ये नातेवाइकालाही प्रवेश दिला जात नाही. जोपर्यंत रुग्ण आमच्या रुग्णालयात उपचार घेत आहे. तोपर्यंत आम्ही कोणालाही भेटू देत नाही. पूर्णपणे बरा झाल्यानंतरच रुग्ण घरी सोडला जातो. त्यावेळी नातेवाइकांना रुग्णाला भेटता येते, पण रुग्णालयात आम्ही प्रचंड खबरदारी घेतो.

डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक