मुरघास निर्मितीसाठी अर्थसाहाय्याचा लाभ घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:52 IST2021-02-27T04:52:16+5:302021-02-27T04:52:16+5:30

सातारा : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मुरघास निर्मितीसाठी ‘सायलेज बेलर मशीन युनिट’ स्थापन करण्याकरिता जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संघ, संस्था, ...

Take advantage of financing for fodder production | मुरघास निर्मितीसाठी अर्थसाहाय्याचा लाभ घ्या

मुरघास निर्मितीसाठी अर्थसाहाय्याचा लाभ घ्या

सातारा : राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत मुरघास निर्मितीसाठी ‘सायलेज बेलर मशीन युनिट’ स्थापन करण्याकरिता जिल्ह्यातील सहकारी दूध उत्पादक संघ, संस्था, शेतकरी उत्पादन कंपनी, संस्था, स्वयंसहायता बचतगट व गोशाळा, पांजरपोळ, गोरक्षण संस्था यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेसाठी प्रतियुनिट रुपये २० लाख खर्चांपैकी ५० टक्के म्हणजे १० लाख रुपये केंद्र शासनाचे अर्थसाहाय्य असून, उर्वरित ५० टक्के रक्कम संस्थेने स्वत: खर्च करावयाची आहे. हा निधी सर्वसाधारण योजनेतील असल्याने योजनेसाठी जिल्ह्यातील एक युनिट मंजूर झाले आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील संस्थांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त अंकुश परिहार यांनी केले आहे. या योजनेचा अर्ज पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती येथे उपलब्ध असून, १० मार्चपर्यंत इच्छुकांनी अर्ज सादर करावेत. असे आवाहनही करण्यात आले आहे.

Web Title: Take advantage of financing for fodder production