शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
4
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
5
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
6
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
7
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
8
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
9
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
10
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
11
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
12
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
13
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
14
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
15
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
16
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
17
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
18
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
19
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
20
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
Daily Top 2Weekly Top 5

वडूज पोलिसांकडून संशयिताला कोठडीत मारहाण - :नातेवाइकांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 20:49 IST

विकासची आई व त्याची पत्नी खासगी रुग्णालयात गेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याची तब्येत खूपच गंभीर होत चालली आहे

ठळक मुद्देप्रकृती चिंताजनक

वडूज : सावकारीच्या गुन्ह्यात संशयित आरोपी म्हणून अटक केलेल्या विकास शामराव जाधव (वय २१, रा. वडूज, ता. खटाव) याला वडूज पोलिसांनी कोठडीतच अमानुषपणे मारहाण केल्याची तक्रार नातेवाइकांनी उपविभागीय अधिकारी अनिल वडनेरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, विकास ऊर्फ बकाशा शामराव जाधव याला वडूज पोलिसांनी सावकारकीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून बुधवार, दि. १४ रोजी अटक केली. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. गुरुवार, दि. १५ रोजी विकास याला वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक पाटील, हवालदार खाडे व लोखंडे हे त्याला घरी घेऊन आले व घराची झडती घेतली. परत गेल्यानंतर त्यांनी विकासची तब्बेत बिघडली असल्याचे घरच्यांना सांगितले. विकासची आई व त्याची पत्नी खासगी रुग्णालयात गेले असता, तेथील डॉक्टरांनी त्याची तब्येत खूपच गंभीर होत चालली आहे. त्याला सातारा येथे घेऊन जावा, असा सल्ला दिला. त्यामुळे त्याला साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, विकासचा भाऊ विजय जाधव याने सांगितले की, पोलीस ठाण्यात असताना त्यांनी विकासच्या छातीत व पाठीत बुक्क्या मारल्या. त्यानंतर त्याला पोलीस निरीक्षक अशोक पाटील यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी विकासला बंदूक लावून मोबाईलवर रेकॉर्ड करण्यास सांगितले. त्यावेळी त्यांच्यासोबत दोन सरकारी कर्मचारी होते. त्यांच्यासमोर त्यांना शिव्या देण्यास सांगून त्या शिव्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्या. विकासला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच त्याच्या गुप्तांगाला धरून शारीरिक त्रास दिला. मोक्का लावण्याची धमकी!‘पाच लाख रुपयांच्या सावकारीची केस आहे, तू आम्हाला तीन लाख रुपये दे, पैसे दिले नाही तर तुम्हा दोघा भावांना ‘मोक्का’ लावेन,’ अशीही पोलिसांनी धमकी दिल्याचे विजय जाधव याने तक्रारीत म्हटले आहे. 

संबंधित घटनेबाबत नातेवाइकांकडून तक्रारी अर्ज प्राप्त झाला आहे. याबाबत योग्य त्या मार्गदर्शनासाठी वरिष्ठांकडे हा तक्रारी अर्ज प्रत्यक्ष पोलीस कर्मचारी घेऊन रवाना करण्यात आला आहे.-अनिल वडनेरे, उपविभागीय पोलीस अधिकारी

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSatara areaसातारा परिसर