शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सक्शन गाडीने उपसला मैला!

By admin | Updated: August 20, 2015 21:41 IST

सदर बझार परिसर चकाचक : ‘लोकमत’च्या वृत्तानंतर पालिकेची स्वच्छता मोहीम--लोकमतचा दणका

सातारा : सदर बझार येथील मैला प्रकरण ‘लोकमत’ने उघडकीस आणल्यानंतर प्रशासकीय व सामाजिक वातावरण ढवळून निघाले. पालिकेने संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करून काम बंद केले. पण अर्धवट कामामुळे तेथील रहिवाशांना ‘नरक’यातना सहन कराव्या लागत होत्या. बुधवारी पालिकेने वरवरची स्वच्छता केली. मात्र मूळ समस्या जैसे थे राहिली होती. आज सकाळी पुन्हा पालिकेने स्वच्छता मोहीम राबवून सक्शन गाडीच्या साह्याने टाकीतील मैला उपसला आहे. कामगारांनी शौचालयाच्या टाकीतला मैला बादलीनं उपसून नाल्यात ओतून दिल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. याविरोधात महिलांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये ‘सदर बझार परिसरात पालिकेची ‘वरवरची स्वच्छता’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच दुसऱ्या दिवशी पालिकेने पुन्हा स्वच्छता मोहीम हाती घेऊन सक्शन गाडीच्या साह्याने शौचालयाच्या टाकीतील मैला उपसला. तसेच सफाई कर्मचाऱ्यांनी स्वच्छताही केली. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. यावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक शिवदास साखरे, भागनिरीक्षक रणदिवे उपस्थित होते. (प्रतिनिधी) तर नागरिकांचा उद्रेक झाला नसतादोन आठवड्यांपूर्वी पालिकेच्या ठेकेदाराने येथील शौचालयाची टाकी साफ करताना कामगारांनी मैला बादलीने उपसून शेजारच्या नाल्यात ओतून दिल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावेळीच स्वच्छता मोहीम हाती घेतली असती तर नागरिकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागले नसते. सदर बझार येथील नवीन भाजीमंडई शेजारी असलेल्या शौचालयाची पालिकेने आज पुन्हा संपूर्ण स्वच्छता केली आहे. टाकीतील मैला सक्शन गाडीने काढला आहे, तसेच टाक्या धुवून घेतल्या आहेत. तसेच परिसरातील गटारेही स्वच्छ करण्यात आली आहेत.- शिवदास साखरे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, नगरपालिका, सातारा