शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी श्रमदानातून दिली वसंतगडाला झळाळी...

By admin | Updated: February 9, 2015 00:41 IST

चार लाखांचे काम : दोन दिवसात गडाचं रूपडं बदललं

मल्हारपेठ : कऱ्हाड तालुक्यातील किल्ले वसंतगडावर येथील बापूजी साळुंखे महाविद्यालय राष्ट्रीय सेवा दलाच्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीराजे गड-किल्ले संवर्धन संघ यांच्या सहकार्याने स्वच्छता मोहीम राबवून दोन दिवसांत गडावर चार लाखांचे काम पूर्ण केले. दोन दिवसात गडावरील ऐतिहासिक वास्तूंची सफाई करून विद्यार्थ्यांनी श्रमदानातून गडाला झळाळी देण्याचे काम केले.वसंतगडावर दोन दिवस संवर्धन कॅम्प आयोजित करण्यात आला होता. यामध्ये विद्यालयाचे नव्वद विद्यार्थी व संघाचे चाळीस कार्यकर्ते सहभागी झाले होते. कॅ म्पसाठी रणजित जाधव, अ‍ॅड. विजय जाधव यांनी अर्थसाह्य केले. दोन दिवस संघाच्या वतीने मनोरंजन व प्रबोधनाचे काम केले. यावेळी काले, ता. कऱ्हाड येथील जयमल्हार मंडळाने दांडपट्ट्याची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखविली. तसेच प्रदीप पाटील यांनी संभाजीराजेंचे चरित्र कथन केले. अक्षय नलवडे यांनी स्त्री व आजचा युवक याविषयी मार्गदर्शन केले. प्रांजली मोहिते यांनी शिवकार्य यामध्ये मुलींचा सहभाग याविषयी मत मांडले. विद्यालयाचे मोहिते यांनी वसंतगडाचे ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले.विद्यालयाचे एन. व्ही. शिंदे, पी. डी. पाटील, डॉ. जे. ए. म्हेत्रे, एम. व्ही. पाटील व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. या अभियानासाठी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. संघाचे अ‍ॅड. अमित नलवडे, नीलेश यादव, संतोष साळुंखे, विराज पाटील, वैभव पाटील, रामचंद्र माळी, नीलेश पाटील, अजित करंदीकर यांचे सहकार्य केले. (वार्ताहर)अशी केली गडावरील स्वच्छताकोयना तळ्यातील काटेरी झुडपे काढलीतळ्याच्या बाजूला तट बांधलासतीशिळा स्वच्छ केल्याचुन्याच्या घाण्याची डागडुजी केलीकृष्णा तळ्यावर तब्बल ३६ फूट लांब, १३ फूट रुंद आणि १८ फूट खोलीचा मोठा बंधारा बांधण्यात आला. तसेच गडावर लावण्यात आलेल्या सहाशे डाळिंब व आंब्यांच्या झाडांना मातीची भर घालण्यात आली. गडाच्या तटबंदी व बुरुजावरील झाडेझुडपे नष्ट करून गडाला झळाळी देण्याचे काम करण्यात आले. गडाच्या मध्यभागी असणाऱ्या चंदोबाच्या मंदिराकडे जाणाऱ्या पन्नास फूट लांब रस्त्यावर दगड, माती टाकून रुंदीकरण करण्यात आले.