शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: अतिपावसाचा फटका; स्ट्रॉबेरीचे क्षेत्र घटणार, नर्सरी रोपाला रोगाचा प्रादूर्भाव 

By नितीन काळेल | Updated: September 7, 2024 19:18 IST

शेतकरी पाऊस उघडीपीच्या प्रतीक्षेत 

सातारा : जिल्ह्यात पाऊस सुरूच असून स्ट्राॅबेरीचे उत्पादन घेणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातही अति पर्जन्यमान झाले आहे. त्यामुळे सध्यातरी स्ट्राॅबेरीची लागण १५ दिवस पुढे गेली आहे. तसेच वाई, जावळी आणि कोरेगाव तालुक्यातही पाऊस अधिक झाल्याने नर्सरीतील स्ट्राॅबेरी रोपांनाही रोगाचा प्रादूर्भाव होऊ लागलाय. यामुळे यावर्षी स्ट्राॅबेरीच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. महाबळेश्वर हे जागितक पर्यटनस्थळ आहे. या तालुक्यात मोठ्या प्रमाणात स्ट्राॅबेरीचे उत्पादन घेण्यात येते. येथील स्ट्राॅबेरीची परदेशात निर्यात होते. तसेच देशातील हैद्राबाद, अहमदाबाद, बडोदा, दिल्ली, कोलकाता, चेन्नईलाही स्ट्राॅबेरी पाठिवण्यात येते. तर महाबळेश्वरला येणारे पर्यटक स्ट्राॅबेरी खाल्ल्याशिवाय पर्यटन पूर्ण झाले असे मानत नाहीत. त्यामुळे महाबळेश्वरच्या स्ट्राॅबेरीला अधिक मागणी असते. पण, यावर्षी सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा उलटला तरी लागणीला वेग आला नाही. अति आणि सध्याही सुरू असलेल्या पावसामुळे लागण किमान १५ दिवस पुढे गेलेली आहे. महाबळेश्वर तालुक्यात दरवर्षी साधारणपणे ५ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबरपर्यंत स्ट्राॅबेरीची लागण करण्यात येते. यासाठी जून महिन्यात परदेशातून रोपे आणण्यात येतात. जिल्ह्यातील वाई, जावळी आणि कोरेगाव तालुक्यात नर्सरीत रोपे तयार करुन नंतर लागण होते. रोपांची लागण झाल्यानंतर दोन महिन्यांपासून फळाला सुरूवात होते. पुढे सहा महिने स्ट्राॅबेरीची एक दिवसा आड तोडणी होते. पण, यावर्षी महाबळेश्वर तालुक्यात अति पाऊस झाला आहे. यामुळे लागण कधी वेग घेणार हे एक कोडेच आहे. त्यातच नर्सरीतील स्ट्राॅबेरी रोपांना रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पाऊस आणखी वाढल्यास आणखी रोग पसरणार आहे. त्यामुळे लागणीसाठी रोपांची कमतरता भासू शकते. परिणामी क्षेत्रातही घट होण्याचा अंदाज आहे. 

  • महाबळेश्वर तालुक्यातील स्ट्राॅबेरी क्षेत्र : सुमारे ३ हजार एेकर
  • स्ट्राबेरी लागण गावे : ५२
  • वार्षिक उलाढाल - २२५ ते २५० कोटी
टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊस