शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चोरलेले दागिने रावसाहेब जाधवला दिल्याचे उघडकीस

By admin | Updated: January 11, 2017 23:29 IST

संशयिताची कबुली : सत्तर लाखांच्या चोरीप्रकरणी एकास अटक

कऱ्हाड : करमाळा येथील रावसाहेब जाधवला ज्या सत्तर लाखांच्या चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्याच गुन्ह्यात मंगळवारी रात्री कऱ्हाड शहर पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याने या चोरीची कबुली दिली असून, चोरलेले दागिने त्यावेळी मी रावसाहेब जाधवला दिले होते, असेही त्याने तपासादरम्यान सांगितले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी दिली. मारुती राजाराम पिटेकर (वय ४५, रा. म्हाळुंगी, ता. कर्जत, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याला बुधवारी येथील प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याला दि. १६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. ११ मे २०१६ रोजी सिमोगा ते मुंबईदरम्यान एक व्यापारी एसटीने प्रवास करीत असताना त्यांची बॅग चोरीस गेली होती. त्यामध्ये सुमारे ७५ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व २ लाख रुपये रोख असा ऐवज होता. कऱ्हाड शहर पोलिसांत याबाबतचा गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, या चोरीप्रकरणी करमाळा येथील संशयित रावसाहेब जाधव याला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान रावसाहेब जाधवचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत रावसाहेबचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी त्यावेळी मोर्चाही निघाला. अखेर शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास धस यांच्यासह बारा जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच तत्पूर्वी त्यांना निलंबितही करण्यात आले. दरम्यान, या चोरीप्रकरणी मारुती पिटेकर याला मंगळवारी रात्री करमाळा तालुक्यातून शहर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ताब्यात घेतले. त्याला अटक करून बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला दि. १६ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, प्रवासादरम्यान व्यापाऱ्याची बॅग चोरल्याची कबुली संशयित मारुती पिटेकर याने दिली आहे. तसेच चोरीचे दागिने रावसाहेब जाधवला विकले होते, असेही त्याने पोलिसांना सांगितले