शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील शोरूममधून चोरलेल्या दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:39 IST

नागठाणे : पुणे येथील शोरूममधील चोरीस गेलेल्या चार दुचाकी गाड्या बोरगाव पोलिसांनी जप्त करून चोरीचा पर्दाफाश केला आहे. नितीन ...

नागठाणे : पुणे येथील शोरूममधील चोरीस गेलेल्या चार दुचाकी गाड्या बोरगाव पोलिसांनी जप्त करून चोरीचा पर्दाफाश केला आहे. नितीन दिनकर सुतार (वय ३५, रा. नागठाणे, ता. सातारा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव पोलीस ठाणे हद्दीतील नागठाणे-सासपडे रस्त्यावर बुधवार (दि. ३) रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास पोलीस हवालदार मनोहर सुर्वे, पोलीस नाईक किरण निकम आणि राजू शिखरे हे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सासपडे चौकात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करत होते. त्या वेळी एक व्यक्ती विनानंबर प्लेटची दुचाकी घेऊन जाताना आढळला. दुचाकी चोरीची असल्याचा संशय आल्याने त्याचा शिताफीने पाठलाग करून त्याच्या ताब्यातील गाडीच्या नंबर प्लेट आणि कागदपत्रांबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता संबंधित गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्याबद्दल आणखी तपास केला असता वाकडेवाडी पुणे येथील शेलार यामाहा शोरूममधील तीन दुचाकी व एक मोपेड अशा मिळून चार दुचाकी जप्त केल्या. एकूण ४ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या गाड्यांबाबत पुणे शहर येथील खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. त्यानंतर त्याला खडकी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्याकडील पुढील तपासात चोरीच्या आणखी गाड्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल तसेच सहायक पोलीस निरीक्षक डॉ. सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार मनोहर सुर्वे, किरण निकम आणि राजू शिखरे यांनी ही कारवाई केली.